पोटावरची चरबी कमी करण्यासाठी –
- divipawar94
- May 27, 2021
- 3 min read

“भोजनांते विषम वारी” अर्थात जेवण केल्याने लगेच पाणी पिणे म्हणजे विष पिण्यासारखे आहे. कारण आपण जेव्हा अन्नांचा कण तोंडात घेतो तेव्हा आपल्या पोटात एक अग्नी तयार होते, त्यालाच जठर अग्नी म्हणतात. ती अग्नी आपण केलेले जेवण शरीरात पचवतो, शिवाय त्या जेवणातून रक्त, पित्त चरबी तयार करते, परंतु आपण जेवण केल्यानंतर लगेचच पाणी पिऊन टाकतो, पिरिणामी तो जठर अग्नी शांत होतो व आपल्या पोटांतील अन्न पचत नाही तर सडते व आपल्या विविध प्रकारचे पोटाचे आजार उदभ्वतात. पोटावरची चरबी कमीकऱण्यासाठी सगळ्यात गरजेचा आहे संतुलित आहार. आपल्या आहारात असा गोष्टींचा समावेश करा ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतील. गाजर तसेच हिरव्या भाज्या मध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक असे पोषकतत्वे असतात. तसेच बीन्स या पोषकतत्वांचा खजिना आहे. हे दोनही पदार्थ तुम्ही तुमच्या सलाडमध्ये समाविष्ट करू शकता. जेवणाच्या ३० मिनिटेआधी तुम्ही सलाड खाल्ल्यास पोटावरची चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होईल. यासोबतच लेमन टी अथवा ग्रीन टीही घेऊ शकता.
काय करा ?
1. वजनासोबतच पोटावरची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही ओवा खाऊ शकता. यासाठी तुम्ही ओव्याचे पाणी पिऊ शकता. यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल. यासाठी रात्री एक कप पाण्यात ओवा भिजत घाला आणि सकाळी उठून रिकाम्या पोटी हे पाणी प्या.
2. दालचिनी डायबिटीज कमी करण्यास फायदेशीर आहे तसेच दालचिनीचा वापर तुम्ही वजन कमी करण्यातही करू शकता. जर तुम्हाला डायबिटीज आहे आणि तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर दालचिनी आणि मध एकत्रित मिसळून घेतल्यास पोटावरची चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
3. कोमट पाण्यात लिंबाचा रस व थोडे मिठ मिसळून घ्या. रोज सकाळी या मिश्रणाचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॅलिजम चांगले राहाते आणी त्यामुळे पोटाची चरबी व वजन कमी करण्यासाठी मदत होईल.
4. पोटाची चरबी कमी करण्यासाठी, दररोज उच्च फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. जसे की, शेंगदाणे, फ्लेक्स बियाणे, ब्रुसेल्स अंकुर, ब्लॅकबेरी इ. हे फायबर युक्त पदार्थ वजन कमी करण्यास मदत करू शकतात.
5. जेवणाची वेळ महत्वाची आहे. रात्री उशीरा जेवण केल्याने पोटावरील चरबी वाढते. त्यामुळे रात्री झोपण्याच्या आधी किमान २ तास तुमचे जेवण झालेले पाहिजे
6. तुम्ही पहाटे उठून कमीत कमी २ किमी पायी चालाण्याची सवय स्वतःला लाऊन घ्या. असे केल्याने तुमच्या पोटावर आलेली चरबी कमी होण्यास सुरवात होईल.
7. जेवण केल्यानंतर शतपावली केल्याने कंबरेचा व पोटाचा आकार कमी होण्यास मदत होईल.
8. दैनंदिन आयूष्यात योगासन करण्याचे अनेक फायदे आहेत आणि त्यातील एक म्हणजे योगासन केल्याने वजन घटण्यास मदत होते. पोट कमी करण्यासाठी नौकासन हा योगासनाचा प्रकार सर्वोत्तम आहे. तसेच वक्रासन, कपालभाती, अनुलोंमविलोम, भुजंगासन, उष्ट्रासन केल्याने कंबरेचा व पोटाचा आकार कमी होण्यास मदत होईल.
काय टाळा ?
1. ट्रान्स फॅक्ट म्हणजे पॅकिंग मधील अन्न. हे अन्न बऱ्याच दिवसापासून साठवलेल असू शकत. या खाद्यपदार्थाचं उत्पादन दिनांक आणि त्याची पॅकिंग प्रोसेस वर अवलंबून आहे. शक्यतो पॅकिंग केलेलं अन्न खाणे टाळावे. यामुळे फॅट वर नक्कीच परिणाम होतो.
2. संशोधनात असे आढळून आले आहे की, जास्त प्रमाणात मद्यपान हे पोटातील चरबी वाढण्यास जबाबदार असू शकते. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी अल्कोहोल चे सेवन कमी करावे.
3. ताण कमी करा. तणाव हे कॉर्टिसॉल तयार करण्यासाठी एड्रेनल (adrenal) ग्रंथींना ट्रिगर करतो. हे तणाव संप्रेरक म्हणून देखील ओळखले जाते. संशोधनात असे दिसून आले की उच्च कोर्टिसोलची पातळी ही भूक वाढवते. हे पोटा भोवतील चरबी वाढवते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तणावातून मुक्त होण्यासारख्या सुखद क्रियांमध्ये व्यस्त रहा जसे की ध्यान,योग इ.
4. गोड पदार्थ टाळा. जास्त प्रमाणात साखर च्या सेवनाने वजन वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. साखर चे जास्तीत जास्त सेवन करणे म्हणजे बर्याच जुन्या आजारांना आमंत्रण दिने आहे. जसे की, यकृत रोग (liver disease), टाइप २ मधुमेह (type 2 diabetes), हृदयविकार (heart disease), लठ्ठपणा इ. म्हणून जास्त प्रमाणात गोड पदार्थाचे सेवन करणे टाळले पाहिजे.
टीप - वरील कोणतेहीउपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments