पित्तदोष
- divipawar94
- Jun 24, 2021
- 1 min read
शरीरातीलतीन दोषांपैकी एक दोष म्हणजेपित्त. जर पित्त आवश्यकप्रमाणात शरीरात उपस्थित असेल तर तेशरीरातील विविध व्यापार सुरळीतपणे चालण्यास मदत करते. मात्रआवश्यक प्रमाणापेक्षा पित्त कमी किंवा जास्तझाल्यास रोग उत्पन्न होतात, तेव्हा त्याला दोष म्हणतात. पित्ताचेप्राकृत स्वरूप बघितले असता ते तीक्ष्णगुणाचे, पातळ, दुर्गंधित व गरम असते. त्याच्या मूळ स्वरूपात त्याचारंग पिवळा व चव तिखटअसते; तर विकृत स्वरूपातत्याचा रंग काळपट निळाव चव आंबट होते. पित्त सर्व शरीरव्यापी असलेतरी नाभी, आमाशय, स्वेद, लसीका, रस, रक्त, यकृत, प्लीहा, हृदय, दृष्टी व त्वचा हीपित्ताची प्रमुख स्थाने आहेत. अन्नाचे पचन करणे, उष्णतानिर्माण करणे, तहान व भूकनिर्माण करणे, रुची उत्पन्न करणे, शरीर कोरडे करणे इत्यादी पित्ताचीकार्ये आहेत. कार्य व कार्यक्षेत्राच्या दृष्टीने पित्ताचेपुढील पाच प्रकार मानलेआहेत : पाचक पित्त, रंजकपित्त, साधक पित्त, आलोचकपित्त आणि भ्राजक पित्त. पाचक पित्त हे पक्वाशय वआमाशय यांमध्ये राहते. खाल्लेल्या अन्नाला पचविणे, त्यापासून वातादी दोष, रसादी धातू, मूत्र, विष्ठा वेगवेगळे करणे हे यापित्ताचे काम आहे. पाचकपित्त हे स्वत:च्याजागी राहूनच इतर चार पित्ताचीव शरीरात जिथे अग्नीचा व्यापारसुरू आहे तिथे अग्नीचीशक्ती वाढविते. रंजक पित्त यकृतव प्लीहेमध्ये राहते. पचलेल्या आहारापासून जो रस धातूतयार होतो, त्यावर रंजक पित्ताची प्रक्रियाहोऊन त्याला लाल रंग प्राप्तहोतो आणि रक्त तयारहोते. साधक पित्त हृदयातराहते. इच्छित मनोरथ साधण्याचे काम यामुळे होतेअसे वर्णन आहे. डोळ्यांच्या ठिकाणीराहणाऱ्या आलोचक पित्तामुळे समोर दिसणाऱ्या गोष्टींचेदर्शन घडते. भ्राजक पित्त हे त्वचेच्या आश्रयानेराहते. त्वचेवर लावल्या जाणाऱ्या विविध लेप व तेलइत्यादींचे पाचन या पित्तामुळेहोते. शरीराची विशिष्टकांती प्रकाशित करण्याचे काम या पित्तामुळेघडते.
संदर्भ :
सुश्रुतसंहिता —सूत्रस्थान, अध्याय २१ श्लोक १०, ११.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments