top of page
Search

पिंपल्स येण्याची कारणे आणि उपाय

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Aug 1, 2021
  • 3 min read

आजकालच्याधावपळीच्या जीवनात प्रत्येक जण आपल्या आहारावरलक्ष देत नाही, कारणजास्त वेळ नसल्यामुळे कोणआपल्या शरीरावर लक्षच देत नाही पणतुम्ही तुमच्या शरीरावर लक्ष देणे खूपगरजेच आहे. प्रत्येकाला आजच्यायुगात चांगलं दिसायच आहे, आपला चेहराचांगला दिसावा तस आपले गोरेपनअसावा कोणत्याही प्रकारचे चेहऱ्यावर पिंपल्स नको आहेत तसेचचेहऱ्यावर जे ऑईल साचतअसत ते सुद्धा नकोवाटत. तसेच चेहऱ्यावर काळेडाग असतात त्यामुळे आपली स्किन खूपडल दिसते त्यामुळे आपण किती जरीचांगली कपडे घातले नाकी चेहऱ्यामुळे काही न काहीआपल्या पर्सनॅलिटी कमीच दिसायला सुरुवातहोते.


पिंपल्सयेण्याची कारणे

आयुष्यामधीलआपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची एक स्टेज असतेजी की वयाची १५वर्षांपासून चालु होते, सर्वसाधारणआपल्या इकडची लोक अशी म्हणतातकी मुले वयात आलीआहेत त्यामुळे त्यांना पिंपल्स यायला सुरुवात होते पण याचाआणि पिंपल्स चा संबध जास्तनसून बऱ्यापैकी आहे. जसे कीमुलीना या वयात मासिकपाळी यायला सुरू होते म्हणजेचमुलगी वयात आलेली असते. मुली मासिक पाळी मध्ये जेखायच नाही ते खातातआणि जे खायच आहेते खात नाहीत. तसेचमासिक पाळी च सोडलेतर आपण आपल्या आहारावरसुद्धा नीट लक्ष देतनाही त्यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. आपण आपल्या चेहऱ्याचीकाळजी नीट घेत नाही, आपल्या तोंडाची स्किन खूप सॉफ्ट असतेआणि त्या सॉफ्ट स्किनला आपण कसेही ओबडधोबडप्रकारे ट्रीट करतो त्यामुळे आपल्याचेहऱ्याची पूर्ण वाट लागून जाते. तसेच वेळच्या वेळ चेहऱ्याला जेघटक पाहिजेत म्हणजे की आपल्या स्किनसाठी जे घटक पाहिजेजो आहार पाहिजे तोजर घेतला नाही तर चेहराखराब होयला सुरुवात होतो. सकाळी उठल्यानंतर काही लोक फिरायलाजातात तर काही लोकव्यायाम करतात, त्यावेळी आपले शरीर थंडअसते पण जेव्हा आपणव्यायाम करतो तेव्हा आपल्यालाघाम आणि त्या घामामुळेसुद्धा आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स यायला सुरुवात होतात. खरे सांगायचे म्हणलेतर तुम्ही व्यायाम केला तर तुमच्याअंगातील उष्णता बाहेर पडते, अंग पूर्णपणे गरमपडत आणि हळू हळूघाम यायला सुरू होने. घामयेणे म्हणजे की आपल्या शरीरातजे हानिकारक द्रव्य आहेत ते घामाद्वारेबाहेर पडायला सुरू होते. शरीरातीलते द्रव्य घाण असते त्याचाउपयोग आपल्या शरीरासाठी काहीच नसतो त्यामुळे आपलेशरीर तर चांगले कामकरत आहे पण तुम्हालाजेव्हा घाम येतो तोफक्त आपण कोणत्या तरीकपड्याने पुसून टाकतो. खूप लोक आहेतकी घाम आला कीतो फक्त कपड्याने पुसूनटाकतात अत्ता सकाळी आपण व्यायाम केलाकी नंतर अंघोळ करतोचपण जेव्हा आपण बाहेर जातोकिंवा संधकाळी फिरायला व्यायाम करतो तेव्हा घामयेतो तर तुम्ही संध्याकाळीअंघोळ केली पाहिजे कारणअंघोळीने आपले शरीर फ्रेशराहते आणि जो घामअसतो तो निघून जातो. पण घाम आला कीतुम्ही लगेच अंघोळ करूनका आधी तो घामपूर्णपणे ड्राय होऊद्या आणि नंतर अंघोळकरा, कारण जर तुम्हीघामात अंघोळ केली तर तुम्हालासर्दी होऊ शकते. त्यामुळेघाम ड्राय झाला की अंघोळकरा त्यामुळे सुद्धा पिंपल्स नाहीत येणार.

मुलींच्याबाबतीत सांगायला गेले तर त्यांचीकेस खूप मोठी असतातआणि ती केस नेहमीचेहऱ्यावर पडत असतात त्यामुळेकेसामध्ये काही धूळ बसलेलीअसते ती चेहऱ्यावर येतकिंवा केसाला जर आपण तेललावले असले तर केसचेहऱ्यावर पडून पडून चेहरातेलकट होयला चालू होतो. आणिमुलांच्या बाबतीत सांगायला गेले तर जास्ततेल लावल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात. आणि सर्वात महत्वाचंम्हणजे आपल्या केसातील कोंडा. कोंडा हा एक असाप्रकार आहे की जरझाला तर तुमच्या डोक्यातखाज होयला सुरू होते आणितोच कोंडा तुमच्या चेहऱ्यावर पडतो आणि त्यानेलगेच पिंपल्स यायला सुरुवात होते. त्यामुळे केसांची निगा राखली पाहिजे, वेळच्या वेळी केस धुतलेपाहिजेत त्यामुळे सुद्धा केसात कोंडा होत नाही. मुलीतर रोज केस धुतनाहीत पण आठवड्यातून दोनवेळा केस धुतले पाहिजेतत्यामुळे केसात कोंडा होणार नाही.

आजकालआपण पाहत आहोत कीप्रत्येक जण वेगवेगळ्या हेयरस्टाईल करत आहे, पणती हेयर स्टाईल केल्यानंतरआपण हेयर सुद्धा सेटकरतो, त्यावेळी ब्लो ड्रायर चावापर करतो पन त्यानेआपला चेहरा गरम पडतो, कारणत्यामधील जी हवा बाहेरपडत असते ती गरमअसते त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर तेल साचते. ब्लोड्रायर चा वापर करूनये त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. आहारातीलबदल म्हणजेच आपण आजकाल कोणत्याहीप्रकारचे अन्न खात आहेत्यामुळे आपल्या चेहऱ्याची दुर्दशा वाढत चालली आहे, जसे आपण चमचमित पदार्थखातो. जास्तीत जास्त मसाले पदार्थ, तेलाचे तळलेले पदार्थ आपण आहारात घेतोत्यामुळे आपल्याला पिंपल्स उदभवायला चालू होते. आपल्याशरीरात एक Oily Gland असते ती तेलसाठवून घेण्याचे काम करत असते, त्यामुळे आपण जेवढे तेलकटखाणार तेवढे तेल साचणार आणितेच तेल आपल्या चेहऱ्यावरपरिणाम करणार त्यामुळे जास्तीत जास्त तेलकट, मसाले पदार्थ खायला टाळले पाहिजेत.


पिंपल्सजाण्याचे उपाय.

दिवसातूनतुम्ही कमीत कमीत चारलिटर पाणी पिले पाहिजेआणि जर जास्त पीतअसाल तर मग चांगलीचगोष्ट आहे, कारण आपल्याशरीरातील जी oily gland असते ती जीतेल साचून ठेवण्याचे काम करत असतेते ऑईल साफ करण्याचेकाम पाणी करत असते. पाणी पिल्याने तुमच्या चेहऱ्यावर तेल साचत नाहीआणि तेल न आल्यानेचेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत. तसेचपाणी पिल्याचा अजून फायदा आहेतो म्हणजे तुमची किडनी सुद्धा चांगल्या प्रकारे राहते. तुमच्या आहारात जास्तीत जास्त पालेभाज्या तसेच फळभाज्यांचे प्रमाणठेवणे गरजेचे आहे त्यामुळे आपलाचेहरा सुद्धा फ्रेश राहतो, आणि सर्वात महत्वाचेम्हणजे तुम्ही जास्तीत जास्त फळे खाल्ल्याने तुमच्याचेहऱ्याला खूप फायदा आहेत्यामुळे तुमची स्किन फ्रेश राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्यासुद्धा पडत नाहीत. मसालेदारआणि तेलकट पदार्थांपासून जास्तीत जास्त दूर रहा. आपणकोणत्याही कामानिमित्त बाहेर जातो त्यामुळे आपलाचेहरा खराब होतो, बाहेरजास्त Pollution असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर धूळ बसते त्यामुळेसुद्धा चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यामुळे दिवसातून तुम्ही पाच ते सहावेळा चेहरा धुवा.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page