top of page
Search

ब जीवनसत्व [Vitamin B]

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jun 2, 2021
  • 2 min read

Vitamin B चा शोध फुंक या शास्त्रज्ञाने १९१२ मध्ये लावला. तांदळाच्या दाढी वेगळ्या करून त्यावर शोध लावला व त्याला ब जीवनसत्व असे नाव देण्यात आले. त्यानंतर आणखी ८ जीवनसत्वांचा शोध अशाच प्रकारे लागला व त्यांना ब जीवनसत्वांचा समूह असे नाव देण्यात आले. ब जीवनसत्व पाण्यात सहज विरघळते व आपल्या शरीरातील चयापचय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावतो . ह्या जीवनसत्वाची नावे सामान्यतः सारखीच आहे पण रासायनिकदृष्टीने ती भिन्न सयुंगे असतात. Vitamin B मुळे आपली पचनक्रिया चांगली राहते. त्वचा निरोगी व केस मजबूत होतात. ब जीवनसत्व हे आपल्या नवीन आजारांपासून लढण्यास मदत करतात.इतर पोषकद्रव्याप्रमाणे मानवी शरीरात जीवनसत्वाचे विघटन केले न जाता ती जशीच्या तशी वापरली जातात. जीवनसत्व ए, ड , ई आणि के हे शरीरात मेदात साठवलेली असल्यानी ती रोज घेण्याची गरज नसते. जीवनसत्व ब आणि के पाण्यात विरघळणारे घटक असल्यामुळे ते शरीरात साठवून ठेवू शकत नाही. त्यामुळे ह्या जीवनसत्वाचे सेवन रोजच्या आहारातून घेणे गरजेचे ठरते.जर ब आणि के जीवनसत्वाचे प्रमाण शरीरात जास्त झाले तर ते शरीरातून लघवीवाटे बाहेर निघून जातात.


जीवनसत्त्व बीचे प्रकार -


बी1 थिआमिन

बी2 रिबोफ्लॅव्हिन

बी3 निआसिन

बी5 पॅंटोथेनिक एसिड

बी6 पायरोडिक्सिन

बी7 बायोटिन

बी8 इनॉझिटॉल

बी12 कॉबॅलॅमिन


जीवनसत्त्व बी कॉंप्लेक्सचे फायदे -


बी1: जीवनसत्त्व बी1 मध्ये पार्किन्संसविरुद्ध तंत्रिकासंरक्षक प्रभाव असतात आणि ते मेंदूच्या कोशिका (न्युरॉन्स)भोवती एक सुरक्षात्मक आवरण मायलिन शीथ बनण्यात साहाय्य करते. ते एक वेदनाशामक म्हणून कार्य करते आणि डायस्मिनॉरिआमध्ये वेदना कमी करण्यासाठीही वापरले जाते.


बी3: ते हृदयाला ऑक्सिडेटिव्ह हानी क्षती कमी करणें आणि कॉलेस्टरॉल स्तर कमी करण्याद्वारे हृदयरोगांचा धोका कमी करते.


बी5: त्याला पॅंटोथेनिक एसिडही म्हणत असल्याने, जीवनसत्त्व बी5ची आरबीसी निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका असते आणि अशा प्रकारे रक्तक्षयाविरुद्ध एक निवारणात्मक कार्य होतो. या जीवनसत्त्वाची कमतरता हृदयाघात आणि स्ट्रोकसारख्या हृदयरोगाच्या समस्यांचा धोका वाढवते.


बी6: जीवनसत्त्व बी6 एक नैसर्गिक वेदनाशामक आहे. ती चयापचयाला शक्ती देते आणि अंगांचे कार्य सुधारण्यात मदत करते.


बी7: हे शास्त्रीयरीत्या सिद्ध झाले आहे की या जीवनसत्त्वाचे सप्लिमेंटेशन केल्याने केसगळती टळण्यात मदत होते आणि नखांची ताकद व संरचना सांभाळली जाते.


बी8: जीवनसत्व बी8 विशेषकरून महिलांसाठी लाभकारक असल्याची माहिती असून ते पीसीओएसच्या उपचारामध्ये वापरले जाते आणि महिलांमध्ये वजन कमी करण्यास वाव मिळतो. ते गेस्टेशनल डायबेटीझचा धोकाही कमी करतो.


बी12: जीवनसत्त्व बी12चे शरिरासाठी अनेक कार्य व फायदे आहेत.तो त्वचा, नख आणि केसांच्या आरोग्याला सांभाळतो व सुरक्षित ठेवतो, रक्तक्षय टाळतो आणि हायपरपिग्मेंटेशनचा धोका कमी करतो.हे जीवनसत्त्व डिमेंशिआ टाळतो आणि अवसाद व चिंता यांना लांब ठेवतो.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT (Diploma In Yoga Teacher)

[योग शिक्षिका]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page