'बाळगुटी'
- divipawar94
- Nov 18, 2021
- 4 min read
बाळासाठी 'बाळगुटी'
सगळ्यांनाच आपलं बाळ हसरे आणि गुटगुटीत हवे असते . गुटगुटीत बाळासाठी आयुर्वेदाने बाळगुटी सांगून ठेवली आहे. ही एक अनमोल भेट आहे. बाळगुटी याचा अर्थ काही ठराविक प्रकारच्या औषधांचे उगाळून केलेले मिश्रण!
पण सध्याच्या आधुनिक युगात आपण आपलेच अनमोल शास्त्र विसरत चाललो आहे.
बाळगुटी द्यावी- देऊ नये? याबद्दल समज गैरसमज पसरताना दिसतात . या बालगुटीतील औषधांमुळे बाळाचा
सर्दी ,खोकला ,जंत, पोटात मुरडा येणे ,ताप येणे, दात निघतांना होणारा त्रास ,वारंवार आजारी पडणे इत्यादी अनेक आजारांवर मात करता येते. व्याधी प्रतिकार क्षमता वाढते, भूक वाढते ,बुद्धी - आकलन शक्ती वाढते ,झोप पुरेशी होते ,आईला देखील आराम मिळतो आणि तिचे देखील स्वास्थ्य व्यवस्थित राहते.
औषधे– बाळगुटी मध्ये बदाम, ज्येष्ठमध , खारीक ,सागरगोटा, वेखंड ,जायफळ, मुरड शेंग, अश्वगंधा ,पिंपळी ,सुंठ ,कायफळ, हिरडा, बेहडा, नागरमोथा, अतिविषा, काकडसिंगी, हळकुंड, कुडासाल, डिकेमाली इत्यादी अनेक औषध द्रव्ये असतात. वेगवेगळ्या व्याधीनुसार एक दोन वेढे कमी अधिक करून औषधींचा उपयोग करावा.
काळजी-(precautions) -- वरील सर्व औषधद्रव्य ठेवण्यास स्टीलचा डबा किंवा काचेची स्वच्छ बाटली असावी. प्रत्येक वेळी गुटिचे सामान स्वच्छ पुसून, कोरडे करूनच ठेवावे.कारण दुधात उगाळल्यानंतर तशीच ओलसर राहिल्यास त्यावर बुरशी येऊन जंतूसंसर्ग (इन्फेक्शन) होण्याची शक्यता असते. म्हणूनच गुटि ठेवण्याचे भांडे ,औषधी वस्तू, उगाळणारी सहान, वाटी, चमचा, बोंडले इ.च्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. सकाळ -संध्याकाळ अशा दोन वेळेस गुटी घ्यावी. दगडी सहान स्वच्छ धुवुन ,त्यावर आईचे दूध चार ते पाच चमचे टाकून त्यात या औषधांचे वेढे उगाळून गुटि बनवावी. पूर्वी ही गुटि बाळांना पाजण्यासाठी खास आकार आकाराचे चांदीचे उपकरण वापरले जाई ,त्याला “बोंडले" असे म्हणत .त्यातून व्यवस्थितपणे गुटि बाळाच्या तोंडात सोडता येते. अगदी आईचे दूध शक्य नसल्यास गाय ,म्हैस आदींच्या दुधातून देखील गुटि देता येते . पण वरील दूध उकळून निर्जंतुक करून घ्यावे.गुटि ताजीच वापरावी. फ्रिजमध्ये ठेवू नये. बाळगुटीत जन्मानंतर दहाव्या दिवसांनंतर सुरू करावी .वेडा किंवा वळसा म्हणजे आईने तर्जनी आणि अंगठा एकमेकांपासून लांब केल्यानंतर त्यामधील अंतर अंगठ्यापासून सुरुवात करून परत अंगठ्यापर्यंत आल्यानंतर एक वळसा किंवा वेढा पूर्ण होतो. बाळाला ही बाळगुटीत वर्षभर रोज दिली तरी चालते त्यानंतर देखील आपण बाळ मोठे झाले तरी देऊ शकता फायदाच होईल. बालकांच्या व्याधीनुसार औषधांचे वेढे कमी जास्त करावे लागतात, म्हणूनच या औषधांविषयी पाहू या १. बदाम- सप्तधातू वर्धक, बुद्धिवर्धक , प्रमाण १० ते१२ वेढे २. खारीक- बलवर्धक, हाडाना पोषक ,उंची वाढविणारे प्रमाण ८ ते १० वेढे ३. जायफळ- निद्रा कर, बुद्धिवर्धक, वजन वाढविणारे प्रमाण ४ ते ५ वेढे.आतड्यांची गती कमी करून, पचन सुधारून जुलाब थांबविण्यासाठी, जायफळ मदत करते .पोट दुखणे थांबवते. परंतु बाळाची शी जर फार कडक असेल तर जायफळ वेढे थांबवावे . व जुलाब होत असतील तर वाढवावे. प्रमाण फार जास्त झाल्यास खूप झोप येते .म्हणून जपून वापरावे. ४. ज्येष्ठमध – धातु पोषक, त्वचा छान ठेवते, पित्तशामक असल्याने उन्हाळ्यात तसेच ऑक्टोबरमध्ये विशेष उपयोगी .सर्दी खोकला, कफ होणे यात उपयोगी.प्रमाण सात ते आठ वेढे. रक्तातील उष्णता कमी करते, बाळाचा रंग उजळते, शरीराला हितकर, आयुष्यवर्धन, मांसधातूचे पोषण करणारे ,डोळ्यांना हितकर आहे. ५.सागरगोटा- जंतुनाशक, पोट दुखणे ,मुरडा येणे, ताप येणे इत्यादींवर उपयोगी .२ ते ३ वेढे प्रमाण ६.मुरुड शेंग – पातळ जुलाब होणे, मुरडा होऊन पोट दुखणे . प्रमाण ७ते८ वेढे. ७.वेखंड - बुद्धिवर्धक,अडखळत बोलणे किंवा उशिरा बोलणाऱ्या बालकांमध्ये उपयोगी .प्रमाण १-२ वेडे.बाळाची भूक वाढते. वेखंड उष्ण असल्याने थंडीपासून बाळाचे रक्षण करते ,म्हणूनच आंघोळीनंतर बाळाच्या डोक्यावर देखील वेखंड चोळली जाते. म्हणजे सर्दी होत नाही.गॅसेस झाल्याने बाळाचे पोट फुगले असेल दुखत असेल तर पोटावर देखील वेखंडाची लेप घालता येतो. वेखंडाचा वास उग्र असल्यामुळे किडे ,मुंग्या त्यापासून दूर पळतात. त्यामुळे बाळाच्या उषा जवळ नेहमी पातळ कपड्यात गुंडाळून वेखंडाची पुरचुंडी ठेवावी. ८.अश्वगंधा-- सप्तधातू वर्धक ,बल्य .प्रमाण दहा ते बारा वेढे. ९.हिरडा – शौच्यास खडा होणे, नियमित संडास न होणे, पोट फुगणे,धातुपोषक ,जंत होणे ,भूक नसणे इत्यादींमध्ये उपयोगी. हिरडाला "आईची" उपमा आयुर्वेदाने दिली आहे. शक्यतो लहान आकाराचा बाळहिरडा न घेता सुरवारी म्हणजे मोठ्या आकाराचा हिरडा घ्यावा. बाळाला जुलाब झाल्यास हिरड्याचे वेढे थांबवावे. ९.पिंपळी – सर्दी ,खोकला ,दमा, ताप इत्यादींमध्ये उपयोगी. प्रमाण चार ते पाच वेढे. १०.काकडसिंगी - उचकी लागणे, सर्दी ,खोकला, ताप इत्यादींमध्ये उपयोगी प्रमाण चार ते पाच वेढे. ११.कायफळ – आवाज सुधारण्यासाठी ,सर्दी, खोकला, ताप इत्यादींमध्ये प्रमाण चार ते पाच वेढे. १२.हळकुंड - यकृतावर उत्तम कार्य ,पचन नीट करते, त्वचेसाठी उपयोगी. सर्दी ,खोकला, ताप इत्यादींमध्ये उपयोगी .प्रमाण चार ते पाच वेढे. १३.डिकेमाली - जंतुनाशक, दात येताना होणाऱ्या विकारांवर उपयोगी १४. कुडा साल- पातळ जुलाब थांबवून मल किंवा संडास नीट घट्ट बांधून ठेवते . अन्न पचनास मदत करते. प्रमाण तीन ते चार वेढे. १५.नागरमोथा- लघवी साफ ठेवते, थंड असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये विशेष उपयोगी .दोन ते चार वेढे प्रमाण १६.सुंठ- खोकला ,पोटदुखी, गॅसेस ,अपचन इत्यादींमध्ये विशेष उपयोगी १६.मिरे – पोटदुखी ,कफ,सर्दी इत्यादींमध्ये उपयोगी दोन ते तीन वेढे. उष्णता असल्यास देऊ नये. १७.बेहडा- खोकला ,ताप, इत्यादींमध्ये दोन ते तीन वेढे १८.खडीसाखर – तहान कमी करण्यासाठी उपयोगी . दहा ते बारा वेढे. १९. मायफळ- हाडे बळकट करण्यासाठी ,दात उत्तम येण्यासाठी संडास घट्ट होण्यासाठी उपयोगी. तीन ते चार वेढे २०आवळा – उत्तम रसायन, शरीरातील सर्व पेशी, धातू उत्तम २०आवळा – उत्तम रसायन, शरीरातील सर्व पेशी, धातू उत्तम निर्माण होण्यासाठी ,जीवनशक्ती चांगली राहण्यासाठी उपयोगी. केस चांगले वाढतात ,काळे होतात .पाच ते सात वेढे २१.सिद्ध दूध – बाहेरचे दूध घ्यायची वेळ आल्यास वावडिंग, सुंठ पाणी इत्यादी टाकून उकळुन घेणे योग्य ठरते. २२.सिद्धजल- बडीशेप, वावडिंग ,सुंठ,सोन्याचे वळे, टाकून उकळलेले पाणी म्हणजे सिद्धजल .हे दिल्याने अपचन, जंत, पातळ जुलाब ,सर्दी इत्यादींमध्ये उपयोग होतो. अशा पद्धतीने योग्य ती काळजी घेऊन बाळगुटी बाळास दिल्यास बाळाची वाढ निकोपपणे होते. बालके वारंवार आजारी पडत नाहीत.त्यांची शारीरिक ,बौद्धिक इत्यादी सर्व प्रकारची वाढ उत्तम होते.




Comments