मानवी जीवनात योगाचे महत्त्व
- divipawar94
- Jun 21, 2021
- 2 min read
''शरीरमाध्यम खलू द्यर्म साद्यनम्'' ही संस्कृत उक्ती अतिशय महत्त्वाची आहे. कोणतंही सत्कार्य (खलू-द्यर्म) साद्यायचं झालं तर ठणठणीतशरीर असल्याशिवाय त्या कार्याची फलश्रुतीसमाद्यानकारक मिळणे द्वरापास्त आहे. मनाचे स्वास्थ्यशरीरावर अवलंबून आहे, तर उलटपक्षी मनासह शरीराचे तंत्र सुरळीत राहते. मनाचा 'योग' कसा साद्यलाजातो पहा; विनोबाजी लिहितात, खाटेवर रुग्ण द्वःखी कष्टी आहे, नर्सची ड्युटीसंपलेली आहे. त्याच्या संपूर्णव्यथा व औषद्यीचे तिलासातत्याने आकलन आहे. तिचीवेळ झाली म्हणून तीघड्याळाकडे पाहून निघून जाणार व द्वसरी रुजूहोणार. तो अत्यवस्थ रुग्णपाहून तिने 'सेवाभावनेने दिलेला अद्यिकचा वेळ ही आंतरिकसेवेची पोचपावतीच नाही का? यालाचगीतेत कर्म, विकर्म, अकर्म; 'योग' असे म्हटलेआहे. तुम्ही स्वतः आतून जोडून घ्या, मग 'मानसिक शांती' कुठे बाहेर शोद्यावीलागत नाही. योगात अष्टांग मार्ग यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, द्यारणा नि समाद्यी यालाप्राद्यान्य दिले गेले. यानेवर पाहिल्याप्रमाणे मानसिक स्वास्थ्य व सोबत जीवनातउठण्याबसण्याचे व खाण्यापिण्याचे नियमघालून घ्यावे लागतात. अन्यथा एकांगी स्वरूपाचे कार्य वा विचार होईल. गीतेत म्हटले आहे ''योगावरी चढू जाता शमसाद्यन बोलिले'' शमचा अर्थ संयम.''न फार खावूनिकिंवा खाणेचि सोडूनि, निजणे, जागणे, खाणे, फिरणे आणि कार्यही मोजूनिकरितो त्यास योग हा दु: ख नाशन.'' अर्जुनाला दिलेला उपदेश सर्वांसाठी योगप्रेरक आहे.
एकदाआपण स्वतःला साद्यारण-सुलभ चाकोरीत बसवूनघेतलं की योगाला पूरकअशी शरीर-मनाची पार्श्चभूमीतयार होते. अर्थात तुम्ही जिथे राहता तेघर अंगण, परिसर, मित्र काया वाचा, पूजाविद्यी, पद्धती, चिंतन-मननाचे तुमचे विषय शरीरासाठी कितीवेळ देता? जेवणासाठी, झोपण्यासाठी वेळ देतोच. व्यायाम-योग-आसन-प्राणायमयाला विहित वेळ देणे गरजेचेआहे. पहेलवान खाल्लेले मुद्दाम मेहनतीने पचवतो व पुन्हा शरीरातकोंबतो. योग-साधक तसेकरणार नाही. त्याला सम्यक आहार, सम्यक विहाराची चाड लागलेली असावी. त्याला आरोग्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरजनाही. तो सकाळ, सायंकाळयोगासाठी वेळ काढणार, नियंत्रितआसन व प्राणायाम करणार.''योग म्हणजे जोडणे'' हा विचार तो आपल्या जीवनातघेऊन निघाला की त्याला निसर्गाशीव नैसर्गिक सहजयोगाशी तो आपले सूत्रजुळविण्याचा प्रयत्न करतो. कारण ''योगः हा दु:ख नाशन'' निसर्गाच्यानियमाप्रमाणे जोडत राहिल्याने उफराटेविचार, आचार नि उच्चारहोण्याचे कारण नाही.जीवनातसर्वांच्या हिताची 'समदृष्टी' यायला लागते.''सर्वांना सुख लाभावे तशीआरोग्यसंपदा, व्हावे कल्याण सर्वांचे, कोणी द्वःखी असूनये.'' ही सर्वात्मक निरामय-आरोग्याची भावना घेऊन तो धारणेवरचढतो. कुठलीही हानिहारक, हिंसक, असत्य बाब तो वर्ज्यकरतो. तशी योग्याची वृत्तीप्राणायाम नि आसनातून स्थिरावते. आता योगाचा अर्थ सकाळी कुठेतरीजाऊन आसने नि प्राणायामकरण्यापुरता मर्यादित राहणार नाही. तो संपूर्ण 'जीवनरहाटीशी' निगडित झालेला असेल. निसर्गात चैतन्य शक्ती काम करते वहे जीवन सहजीवन आहे. यात वाटा संपूर्ण सजीवसृष्टी-चैतन्याचा आहे. ''जिवो जीवस्य जीवनम्'' असे हे परस्परावलंबी जीवनआहे. व्यक्ती ते समष्टीचा प्रवासहा परस्परांना एका अदृश्य साखळीतबांधतो.सत्यम्-शिवम्-सुंदरम् असं मंगलमय जीवनएकमेका साह्य करून जगण्यास सुसह्यकेल्या गेले पाहिजे. सूर्य, चंद्र, तारे आपले नियोजितकार्य करतात. त्यांचा सातत्य-योग आम्ही डोळ्यासमोरआदर्श पाठ म्हणून ठेवलातर हे जीवन सुयोग्यहोईल. 'आत्म-मोक्षार्थ' जगतहितायच' असा 'वसुद्यैव कुटुंबाचा' द्यागा जुळावा!
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योगशिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments