मांसधातु
- divipawar94
- Jul 10, 2021
- 1 min read

मांसधातु
शरीरालामूर्त रूपदेणाऱ्या घटकांनाआयुर्वेदात धातू असेम्हणतात. एकूणसात धातूंपैकीमांस हा तिसऱ्या क्रमांकाचाधातू आहे. रक्ताच्या सारभागापासून मांसाचीउत्पत्ती होते. मांसवह स्रोतसअसलेल्या मांसधातूच्या अग्निद्वारेमांसाची उत्पत्तीहोते. काहीतज्ञांच्या मतेही उत्पत्तीतीन दिवसांत, तर काहींच्यामते दहादिवसांत होते. गुळगुळीत, घट्टव किंचीतलालसर असेमांसाचे स्वरूपआहे. ज्याव्यक्तीचा मांसधातूपरिपूर्ण व उत्तम प्रतीचाअसतो, त्यासमांससार असेम्हणतात. मांससारव्यक्तींचे सर्वअवयव छिद्रविरहित, चांगलेपरिपुष्ट तसेचदिसायला सुरेखअसतात. कानशीळ, कपाळ, डोळे, हनुवटी, मान, खांदे, पोट, छाती, हातापायांचेसांधे हे सर्व घट्ट, मजबूत, सुंदरआणि भरदारअसतात. अवयवांवरलेप करणेआणि शरीरपुष्ट ठेवणेअसे मांसाचेकर्म (कार्य) सांगितले आहे. एकमेकांपासून वेगळेदिसणाऱ्या मासाच्याघट्ट भागांनापेशी म्हणतात. आयुर्वेदानुसार मांसधातूपासूनवसा आणिसहा त्वचाहे उपधातूनिर्माण होतात. तसेच शरीरावरीलरोमरंध्रातून निघणारामळ हा मांस धातूचामळ समजलाजातो. मांसक्षयम्हणजेच मांसधातूआवश्यकतेपेक्षा कमीझाल्यास इंद्रियांचीदुर्बलता, सांध्यांमध्येवेदना, गालआणि कुल्लेयांचा आकारकमी होणेही लक्षणेजाणवतात. ज्याव्यक्तीचा मांसक्षयझाला आहे, त्याला दह्यापासूनबनविलेले आंबटपदार्थ कोशिंबीरीआणि मांसाहारीहिंस्र प्राण्यांचे मांस जास्तआवडते, असे सुश्रुत संहितेचे टीकाकारश्री डल्हणाचार्ययांनी म्हटलेआहे. मांसवृध्दीम्हणजचेच मांसधातूआवश्यकतेपेक्षा वाढल्यासगाल, पोट, कुल्ले, मांड्याआणि गळाया ठिकाणीमांसवृध्दी दिसूनयेते. तसेचफोड, गाठी, अर्बुद, पूतिमांस, ॲलर्जी (अधिहर्षता) यांसारखे रोगहोतात, असे चरक संहितेत म्हटलेआहे. आयुर्वेदानुसारशरीर बळकटकरणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये मांसाहारसर्वश्रेष्ठ मानलाआहे.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments