top of page
Search

मज्जाधातु

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jul 10, 2021
  • 1 min read

शरीरालामूर्त रूपदेणाऱ्या घटकांनाआयुर्वेदात धातू असेम्हणतात. धातूनिर्मितीचा क्रमपाहिल्यास मज्जाहा सहाव्याक्रमांकाचा धातूआहे. मज्जाधातूस्निग्ध स्वरूपाचाधातू आहे. शरीरात स्नेहभावनिर्माण करणे, बल निर्माणकरणे, पुढच्याधातूचे म्हणजेच शुक्रधातूचे पोषणकरणे अस्थिंच्या सुषिरतेमुळेत्यांच्या ठिकाणीनिर्माण झालेलीपोकळी भरणेहे मज्जाधातूचेकार्य आहे. मज्जाधातूचे शरीरातीलस्थान सांगतानासुश्रुताचार्य म्हणतातकी, मज्जाविशेषत: मोठ्याअस्थिंमध्ये असते. वायू महाभूतामुळेअस्थिच्या ठिकाणीसुषिरता (सच्छिद्रता) निर्माण होते. त्यात एक प्रकारचा स्नेहस्वरूप धातूभरला जातो, ज्याला मज्जाअसे म्हणतात. डोक्याच्या कवटीच्याआत असणाऱ्यामेंदूचा अंतर्भावमज्जाधातूत केलाजाऊ शकतो. शौच, नेत्रव त्वचेच्याठिकाणी उत्पन्नहोणारी स्निग्धताहा मज्जाधातूचामल सांगितलाआहे. ज्यापदार्थांच्या सेवनानेशरीरात स्निग्धपणायेतो त्यांनास्नेहद्रव्य म्हणतात. चरकाचार्यांनी असेचार उत्तमप्रकारचे स्नेहद्रव्यसांगितले आहेकी, ज्यातमज्जेचा समावेशआहे. मज्जेच्यासेवनाने शरीराचेबल, शुक्र, रस, कफ, मेद, व मज्जा यांचीवाढ होते. विशेषत: यामुळेहाडांना बळकटीमिळते. म्हणजेचशरीरधारणातच नव्हे, तर प्रत्यक्षचिकित्सेतही या धातूचा उपयोगहोतो. शरीरातमज्जेचे प्रमाणकमी झाल्यासहाडांमध्ये दुबळेपणा, हलकेपणा जाणवतोव शरीरसतत वातरोगानेपीडित असते. सुश्रुतांनी या संदर्भात शुक्रकमी होणे, सांध्यांमध्ये वेदनाहोणे ही लक्षणे विशेषत्वानेसांगितली आहेत. मज्जाधातू अधिकप्रमाणात वाढल्याससर्व शरीरातविशेषत: डोळ्यांच्याठिकाणी जडपणाजाणवतो. तसेचसांध्यांमध्ये वेदनाहोणे, चक्करयेणे, डोळ्यांपुढेअंधारी येणे, बेशुध्द होणे, हातापायांच्या बोटांवरखोलवर पसरलेलेफोडं होणेही लक्षणेदिसतात. ज्याव्यक्तीमध्ये मज्जाधातू उच्चप्रतिचा असतोत्याला मज्जासारम्हणतात. मज्जासारव्यक्ती कोवळ्याअंगकाठीचे परंतु, कृश नसलेलेव बलवानअसतात. त्यांचावर्ण स्निग्धव बोलणेहीस्निग्ध असते. त्यांचे सांधेआकाराने मोठे, गोलाकार लांब असतात. डोळेही मोठेअसतात. ते दीर्घायू, बलवान, उत्तम शास्त्रज्ञानअसलेले, कलाकौशल्यअसलेले, आर्थिकदृष्यासंपन्न, संततीयुक्तव समाजातसन्माननीय असतात.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page