top of page
Search

मलावष्टंभ/ मलावरोध/ बद्धकोष्ठता

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jun 21, 2021
  • 2 min read

उत्तम आरोग्यासाठी व शरीरक्रिया सुस्थितीतचालण्यासाठी घेतलेला आहार हा रोजच्यारोज पचन होऊन मलस्वरुपात बाहेर पडणे गरजेचे असते. परंतु बर्‍याच कारणांमुळे मलत्याग रोजच्या रोज होत नाहीकिंवा मलप्रवृत्ती अधिक बद्ध स्वरुपातव कुंथुन करावी लागते या लक्षणांनाच मलावष्टंभ/ मलावरोध/ बद्धकोष्ठता किंवा constipation म्हटले जाते. मलावष्टंभ हा स्वतंत्र आजारनाही परंतु बर्‍याच आजारांचीपार्श्वभुमी तयार करण्यासाठी कारणीभुतठरतो. यामुळे सुरुवातीला मलावष्टंभ हा जरी किरकोळवाटत असला तरी जास्तकाळ राहील्यास त्याची परीणती अनेक पचनाच्या किंवाइतर विकारांत होऊ शकते. आयुर्वेदानुसारअपान वायु हा आतड्यांच्यासुयोग्य हालचाली घडवुन पचलेला आहार पुढे ढकलुनमलप्रवृत्ती होण्यास कारणीभुत असतो. परंतु खाली वर्णन केलेल्याकारणांमुळे अपाण वायु हारुक्ष गुणाने प्रकुपित होऊन चल गुणाच्याकमतरतेमुळे आतड्यांच्या हालचाली योग्य होत नाहीत तसेचवाताच्या रुक्षत्वाने जलियांश शोषला जाउन मल शुष्कव पिच्छिल होतो असा मलआतड्यांना चिकटुन बसतो व मलप्रवृत्तीसकष्ट, अधिक बद्ध स्वरुपातव कुंथुन होते.

अशाप्रकारे योग्य मलप्रवृत्ती न झाल्याने कुंथुनमलप्रवृत्ती करावी लागणे, पोट जड वाटणेव फुगुन येणे अशी लक्षणेदिसायला लागतात. सोबतच गॅसेस, नाभी खालच्या पोटाच्याभागात जडपणा वाटणे, भुक मंदावणे, कुठल्याहीकामात उत्साह नसणे, उदरशुल, चिड-चिडेपणा, डोकेदुखणे, मळमळ-उलटी, अनिद्राअशी अनेक लक्षणे मलावष्टंभामुळेशरीरावर दिसुन येतात. व खुप काळमलावष्टंभ राहील्यास त्याची परीणती पुढे मुळव्याध, भगंदर, हर्निया, ग्रहनी (IBS), कोलायटीस, शिरशुल, जुनाट सर्दी अशा अनेक आजारांमधेहोऊ शकते.


मलावष्टंभाची कारणे

अपानवायुच्या विकृती साठी वातवर्धक अनेकघटक कारणीभुत असतात जसे, - पचन्यास जड, थंड, शिळेव फरसाण, चिवडा यांसारखे कोरडया पदार्थांचा अहारात अतिवापर; उपवास, अयोग्य वेळी आहार घेणे, भुक नसतांना जेवणे, जास्त प्रमाणात जेवणे; मांसाहार, अंडे, मासे, हॉटेलचे किंवा बाहेरचे खाद्य पदार्थ, फास्ट फुड- जंक फुड, डबाबंद खाद्यपदार्थ या सर्वांचा अतिवापर; बेकरीतील पदार्थ, अंबवलेले पदार्थ, इडली, डोसा, मेदु वडा, ब्रेड, पाव, मैद्याचे पदार्थ; रात्री जागरण, रात्री उशीरा जेवण करणे, दिवसाझोपणे, व्यायामाच अभाव, अपचन, अग्निमांद्य; सिगारेट, तंबाखु, मद्य यांचे जास्तसेवन, तुरट- कडु- तिखट पदार्थांचेअतिसेवन; चिंता करणे, तणाव तसेच आहारातपालेभाज्या, फायबर युक्त पदार्थांचा, तुपाचा अभाव…


मलावष्टंभ टाळण्यासाठी

1. आहारात सकस, फायबर युक्त, स्निग्ध वताज्या पदार्थांचा समावेश करावातसेच पालेभाज्या, काकडी, गाजर, बीट, गाईचे तुप यांचेप्रमाण वाढवावे

2. मलावष्टंभाच्या कारणांमधे सांगितलेला सर्वआहार विहारवर्ज्य करावा.

3. रोज पायीकिमान ४५मिनीटे चालणेहा मलावष्टंभासाठी सर्वात चांगलाव्यायाम आहेयामुळे आतड्यानाबळकटी मिळुनत्यांच्या हालचालीसुयोग्य होतात.

4. पचनशक्ती चांगलीराहण्यासाठी आहारातमसाल्यांचा सुयोग्यवापर करावा, वातवर्धक आहारटाळावा तसेचआहाराच्या वेळानियमित वयोग्य ठेवाव्यात यामुळे योग्यपचन झालेलामल हानिस्सरणास त्रासहोत नाही.

5. तणाव वचिंता यांमुळेहोणारा मलावरोधटाळण्यासाठी मेडीटेशन, प्राणायाम वयोगासनांची अतिशयमदत होते. यासाठी अर्धमत्सेंद्रासन, पवनमुक्तासन, हलासन, बालासन हीआसने केल्यासलाभ होतो.

6. गरम पाण्याचापिण्यासाठी नियमीतवापर केल्यासआतड्यांच्या हालचाली

7. तसेच नाभीच्याखालच्या भागातकोमट तेलानेअनुलोम दिशेनेमालिश केल्यानेदेखिल अल्पप्रमाणात असलेलामलावरोध दुरहोतो.

8. कधीतरी होणार्‍या व अल्पप्रमाणात असलेल्यामलावष्टंभासाठी त्रिफळा+कोमट पाणी किंवाइसबगोल घ्यावे. परंतु बाजारातसहजपणे उपलब्धहोणारे वसवय लगणारेचुर्ण दिर्घकाळघेणे टाळावे.


मलावष्टंभ/ मलावरोध/ बद्धकोष्ठताउपचार

वरील प्राथमिक काळजीघेउनही मलावरोध तसाच राहील्यास लवकरयोग्य उपचार घेणे गरजेचे असते. उपचारामधे मलावष्टंभाच्या कारणांची चिकित्सा करणे अपेक्षित असतेजसे, मलावष्टंभ तणाव-चिंता यामुळेअसेल किंवा हार्मोन्स च्या imbalance मुळे असेल तरवेगवेगळी चिकित्सा करणे गरजेचे असते. आयुर्वेदानुसार अपान वायुच्या रुक्षव चल गुणात वैगुण्यआल्याने मलावरोध होतो त्यामुळे वाताच्याचिकित्सेसाठी अनुलोमक तैल, घृत यांचामुखाने व मात्रा बस्तीद्वारे उपयोग केला जातो. तसेचपचनशक्ती वाढवुन मग त्रिवृत्त, आरग्वध, हरीतकी, द्राक्षा, सोनामुखी यांसारख्या अनुलोमक व मृदुविरेचक औषधांचाप्रकृती व दोष अवस्थेनुसारवापर केला जातो.


टीप - वरीलकोणतेहीउपचारआयुर्वेदतज्ञांच्यासल्ल्यानेकरावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योगशिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page