रक्तधातु
- divipawar94
- Jul 10, 2021
- 1 min read

शरीरालामूर्त रूपदेणाऱ्या घटकांनाआयुर्वेदात धातू असे म्हणतात. एकूण सातधातूंपैकी रक्तहा दुसऱ्याक्रमांकाचा धातूआहे. शुध्दरक्ताचा रंगलाल असतो. येथे शुध्दरक्त म्हणजेवात, पित्त, कफ यांनीदूषित न झालेले रक्तहोय. असेरक्त खूपपातळ किंवाखूप घट्टनसते व ते शरीरातअसताना गोठतनाही. शुद्धरक्त कापडावरसांडले असताकापड धुतल्यावरते स्वच्छहोते व त्यावर रक्ताचाडाग राहतनाही. याचारंग तापविलेल्याधातूप्रमाणे (लोखंड/सोने) किंवाइंद्रगोप किड्याप्रमाणेअसतो; तर वात, पित्त, कफ यांनीदूषित झालेल्यारक्ताचा रंगरक्तचंदन, लाक्षारस (लाखेचा रस) व गुंजेच्यारंगाप्रमाणे असतो. रक्तधातू स्निग्ध, अशीतोष्ण, मधुर-लवण चवीचाअसतो. आहाररसापासूनतयार झालेल्या रसधातूवर रक्ताग्नीची प्रक्रियाहोते. या पाचित रसापासूनरक्ताचे पोषणहोते. तसेचत्यावर रंजकपित्ताची प्रक्रियाझाल्याने रक्तालालाल रंगप्राप्त होतो. रंजनाची ही प्रक्रिया चरकाचार्यव सुश्रुताचार्ययांच्या मतेयकृत व प्लीहा यांतहोते. पित्तालारक्तधातूचा मल मानलेले आहे. सर्व धातूंचाक्षय व वृध्दी रक्तामुळेहोते. याशिवाय मांसधातूचे पोषणकरणे, शरीराच्यारंगाचे प्राकृतत्त्वकायम ठेवणेव बल, सुख, आयुष्यप्रदान करणेही रक्तधातूचीकार्ये आहेत. रक्तधातू त्याच्याप्राकृत प्रमाणापेक्षाकमी झाल्यासभूक मंदावते, शरीरातील वायूचाकोप होतो, त्वचा रुक्ष, कोमेजलेली व स्फुटिर दिसते, रक्तवाहिन्या क्षीणव शिथिलहोतात. अशावेळीआंबट व थंड पदार्थखावेसे वाटतात. रक्तधातू त्याच्याप्राकृत प्रमाणापेक्षावाढल्यास डोळे, त्वचा व रक्तवाहिन्या आरक्तदिसू लागतात. ज्यांचा रक्तधातूउत्कृष्ट प्रतीचाअसतो, त्यांनारक्तसार म्हणतात. अशा व्यक्तीचेकान, डोळे, जीभ, नासिका, ओठ, तळपाय, तळहात, नखे, कपाळ व शिश्न हे सर्व भागस्निग्ध, आरक्तव उजळअसतात. अशीव्यक्ती सुखी, बुध्दीमान, अल्पबलयुक्त, सुकुमार, उष्णताव श्रमसहन न करू शकणारीअसते.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments