रक्तमोक्षण
- divipawar94
- Jun 23, 2021
- 2 min read

एखाद्यारोगाच्या उपचारासाठी शरीरातून त्वचेच्या मार्गाने रक्त बाहेर काढणेम्हणजे रक्तमोक्षण होय. वात, पित्तव कफ हे तीनदोष आवश्यक असलेल्या प्रमाणापेक्षा वाढल्यास काही वेळा तेशरीरातील रक्ताला त्याचे काम नीट करूदेत नाही. अशा रक्ताला दूषितरक्त म्हणतात. या दूषित रक्तामुळेशरीरावर फोड येणे, खाजसुटणे असे काही त्वचेचेविकार होतात; तर तोंड येणे, कडू, आंबट घशाशी येणे, योनीवाटे अकारण रक्त जाणे, वातरक्त (सांधेदुखीचा एक प्रकार) असेअनेक रोग होतात. रक्तमोक्षणालाच रक्तविस्त्रावणकिंवा शोणित विस्त्रावण असेही म्हणतात. कधीकधी या दूषित रक्ताचाप्रभाव सर्व शरीरभर दिसतो, तर कधी तो एखाद्याभागापुरता मर्यादित असतो. दूषित रक्ताचा प्रभाव कुठवर पसरलेला आहे त्यानुसार रक्तमोक्षणाचीपद्धत ठरविली जाते. रक्तमोक्षणाचे मुख्यत: दोन प्रकार पडतात –
शस्त्रकृतरक्तमोक्षण : कपिंग थेरपी.
(१) शस्त्रकृत रक्तमोक्षण : त्वचेवर एखादी चिर मारून किंवासुई टोचून रक्त बाहेर काढलेजाते, त्याला शस्त्रकृत रक्तमोक्षण असे म्हणतात. याचेदोन प्रकार पडतात –
(i) सिरावेध :
यातरक्त काढण्यासाठी सुईचा वापर होतो. जरदूषित रक्ताचा प्रभाव सर्व शरीरभर जाणवतअसेल, तर त्वचेवरून स्पष्टदिसणाऱ्या रक्तवाहिनीत सुई टोचून तिच्याद्वारेरक्त बाहेर काढले जाते. ही पद्धत रक्तदानकरतेवेळी अवलंबविण्याच्या प्रक्रियेप्रमाणे आहे.
(ii) प्रच्छन :
दूषितरक्ताचा प्रभाव एखाद्या भागापुरता मर्यादित असेल, तर प्रच्छन पद्धतीनेरक्तमोक्षण केले जाते. यातत्या भागावरील त्वचेवर चिरा मारून आवश्यकतेवढा रक्तस्त्राव होऊ दिला जातो. या ठिकाणी दूषित रक्ताचा प्रभाव त्वचेखाली खूप खोलवर पसरलेलानसेल, तर ही प्रक्रियालाभदायक ठरते. परंतु, दूषित रक्ताचा प्रभाव थोड्या खोलपर्यंत पसरलेला असेल, तर केवळ वरवरचिरा मारून उपयोग नाही. अशावेळी ‘शृंग व अलाबू’ यादोन उपकरणांचा वापर केला जातो.
(iii) ‘अलाबू’ म्हणजेचभोपळा.
आतूनपोकळ असलेल्या अलाबूत पेटता दिवा ठेऊन तोआतून निर्वात केला जातो वलगेच चिरा दिलेल्या भागावरतो अलाबू दाबून धरला जातो. निर्वातअवस्थेमुळे आत ऋणात्मक दाबतयार होऊन चिरेमधून रक्तबाहेर येऊ लागते. दूषितरक्ताचा प्रभाव त्याहीपेक्षा अधिक खोल असेलतर ‘शृंगाचा’ वापर होतो. ‘शृंग’ म्हणजेशिंग. आतून पोकळ, तळाशीपसरट व टोकाशी निमुळतेअसे विशिष्ट रचना असलेले प्राण्याचेशिंग यात वापरले जाते. शृंगाच्या निमुळत्या टोकाला छिद्र पाडल्यास ते एखाद्या आचुषकाप्रमाणेकाम करते. त्वचेवर प्रच्छन करून त्या चिरेवरशृंगाचा तळ दाबून धरूनवरच्या टोकाने रक्त शोषल्यास खोलवरचेरक्तही बाहेर येते. सध्या शृंग व अलाबूचावापर न करता त्याऐवजीप्लॅस्टिकच्या विशिष्ट कपांचा वापर करतात. त्यांच्यासाहाय्याने केलेल्या रक्तमोक्षणास ‘कपिंग थेरपी’(Cupping therapy) म्हणतात. त्यातही ऋणात्मक दाबाचा उपयोग केला जातो. सुश्रुतसंहितेतविशेषेकरून रक्तमोक्षणासाठी शस्त्रकर्माचा विचार केला आहे.
(२) अशस्त्रकृत रक्तमोक्षण :
शस्त्राचावापर न करता केलेजाणारे रक्तमोक्षण म्हणजे अशस्त्रकृत रक्तमोक्षण होय. जळवांच्या साहाय्यानेकेले जाणारे रक्तमोक्षण. यासाठी बिनविषारी जळवांचा वापर होतो. जळूही एक रक्त शोषणारीजलचर अळी आहे. काहीजळवा विषारी असतात, परंतु त्यांचा रंग बिनविषारी जळवांपेक्षाफार वेगळा असतो. दूषित रक्ताचा प्रभाव एखाद्या भागापुरता मर्यादित असेल, तर जळूचा वापरहोतो. जळू त्वचेला चावाघेऊन पकडते व त्या ठिकाणचेदूषित रक्त शोषून घेते. एका मर्यादेपर्यंत रक्त शोषल्यावर जळूचावा सोडते किंवा आवश्यक तेव्हा तिचा चावा सोडविण्यासाठीतिच्या तोंडावर काही औषधी सोडण्यातयेतात. रुग्णाचे वय, त्याची सहनशक्तीव दूषित रक्ताचे प्रभावक्षेत्र यानुसार रक्तमोक्षणाची पद्धत ठरवली जाते.
संदर्भ :
सुश्रुतसंहिता — सूत्रस्थान, अध्याय १३ , अध्याय १४.
सुश्रुतसंहिता — शारीरस्थान, अध्याय ८.
चरकसंहिता — सूत्रस्थान, अध्याय २४.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)



Comments