रसधातु
- divipawar94
- Jul 10, 2021
- 1 min read

आयुर्वेदानुसारशरीराला मूर्तरूप देणाऱ्याघटकांना धातू असे म्हणतात. एकूण सातधातूंपैकी रस हा प्रथमक्रमांकाचा धातूआहे. येथेरस म्हणजेखाल्लेल्या अन्नावरजाठराग्नीची प्रक्रियाझाल्यानंतर व त्यातून मल निघून गेल्यावरउरलेला सारवानभाग होय. रसधातू हा श्वेत, द्रव, शीत, सौम्यव स्निग्धअसतो. सर्वशरीराची तृप्तीकरणे, वाढकरणे, आहेत्या स्थितीतते टिकवूनठेवणे, स्निग्धठेवणे व त्यात दृढताआणणे ही रसधातूची कार्येहोत. शरीरलठ्ठ असणे, कृश असणेकिंवा मध्यमअसणे यासाठीरसधातू कारणीभूतअसतो. रसधातूआवश्यकतेपेक्षा कमीझाल्यास इतरधातूंत क्षीणताउत्पन्न होते, चेहरा व शरीराचे अन्यअवयव शुष्कहोतात, तहानवाढते. कानांनाकुठल्याही प्रकारचाआवाज नकोसावाटतो. हृदयातकंप किंवाधडधड जाणवते. थोड्याशा श्रमानेहीदम लागतो. रसधातू आवश्यकतेपेक्षावाढल्यास भूकमंदावणे, मळमळणे, तोंडात वारंवारलाळ येणे, वांती होणे, आळस बळावणे, शरीरात जडपणाजाणवणे, शरीरस्पर्श थंडजाणवणे, शरीरपांढरे पडणे, धाप लागणे, खोकला येणे, खूप झोपयेणे ही लक्षणे निर्माणहोतात. स्तन्यहा रसाचाउपधातू, तर मलस्वरूप कफ हा रसाचामल सांगितलाआहे. सुश्रुताचार्यांनुसारस्त्रियांमध्ये तयारहोणारा मासिकस्राव हा देखिल रसापासूनबनतो. ज्यांचारसधातू उत्कृष्टअसतो, त्यांनारससार किंवात्वक्सार असेम्हणतात. अशाव्यक्तीचे त्वचेवरीललोम हे स्निग्ध, मृदू, खोलवर मूळअसलेले, कमीप्रमाणात असलेलेव न गळणारे असतात. त्वचा सुकुमार, प्रभावी, प्रसन्नव मृदूअसते. अशाव्यक्ती आनंदी, सुखी, ऐश्वर्यवान, बुध्दीमान, विद्यासंपन्न, उपभोगी स्वभावाचे, आयुष्यसंपन्न असतात.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)



Comments