top of page
Search

वजन कमी करण्याचे उपाय

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • May 20, 2021
  • 3 min read

1. पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. 2. दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे. 3. पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल. 4. आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल. 5. वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करावा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते. 6. दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी 4 किलोमीटर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. जर तुम्ही रात्री 8:30 नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या. रात्री हलका आहार घ्यावा. 7. वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्तप्रमाणात पांढरे पदार्थ (बटाटे, मैदा, साखर, तांदूळ) कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ ( डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई) खाण्यावर जास्त भर द्या. वजन कमी करण्यासाठी डाएट चार्ट सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवा की, सकाळचा नाश्ता पोटभर करावा. दुपारी त्याच्या अर्ध आणि रात्री तर कमी जेवावं. सकाळ, दुपार आणि रात्रीचं जेवण कसं असावं हे जाणून घेऊया – खाण्याची योग्य वेळ - · ब्रेकफास्ट - सकाळी ७ ते ९ दरम्यान · लंच - दुपारी १२ ते २ दरम्यान · डिनर- रात्री ७ ते ९ दरम्यान सकाळचा ब्रेकफास्ट – · सकाळी उठल्यावर १ ग्लास गरम पाणी · ७ – ८ वाजता - मेथीच्या दाण्याचे पाणी · ९ वाजता - मोड आलेले मूग, चणे किंवा सलाड/दलिया/ओट्स + लस्सी/ताक/ज्युस + फळ दुपारचं जेवण - · १२ ते २ दरम्यान - १ वाटी आमटी + 1 पातळ पोळी + हिरवी भाजी + काकडी आणि टॉमेटो सलाड रात्रीचं जेवण - · ७ वाजता - एक ग्लास लिंबू पाणी (मीठ आणि साखरेशिवाय) · ८ वा ९ वाजता - १ प्रोटीन वा ड्रायफ्रूट्सचा लाडू किंवा मीठ वा साखरेशिवाय एक वाटी दही पाण्याचे महत्व Diet दरम्यान तुमच्या शरीरातील पाणी अजिबात कमी होऊ देऊ नका. त्यासाठी तुम्ही तुमचं शरीर नेहमी हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जितकं पाणी पिणार तितकंच तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम जास्त होणार. मात्र याचा अर्थ असा नाही की, अति पाणी प्यावं. आपल्या शरीरातील वजनाप्रमाणे १० ने भागल्यास त्यातून २ वजा केल्यास, जितकी संख्या येते तितकं लीटर पाणी पोटात जाणं आवश्यक आहे. उहाहरण द्यायचं झालं तर समजा, तुमचं वजन ७० किलो आहे आणि त्याला १० ने भागल्यास, ७ येणार त्यामधून २ वजा केल्यास, ५ संख्या येते. त्यामुळे तुम्ही रोज ५ लीटर पाणी प्यायला हवं. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यामुळे चरबी कमी होते. वजन कमी करण्याचे उपाय आणि पद्धती


1. जेवण्यापूर्वी सूप प्या 2. हेल्दी ब्रेकफास्ट करा 3. थोड्याथोड्या वेळाने खात राहा 4. जेवणात मिरचीचा उपयोग करा 5. रात्री ग्रीन टी प्या 6. उदास न राहता हसत राहा 7. साखरेपासून लांब राहा 8. निळ्या रंगाच्या प्लेटमधून जेवण खा 9. उजेडात नाही तर अंधारात झोपा 10. झोप पूर्ण होऊ द्या 11. रात्री जेवल्यानंतर अर्धा तास चाला 12. दिवसभर हलका व्यायाम करणं आवश्यक आहे.


लवकर वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय खुप वेळा वजन वाढलेल्या लोकांना जिम जाण्याचा अथवा रोज 4 - 5 किलोमीटर धावण्याचा सल्ला देण्यात येतो. परंतू प्रत्येकाला तितका वेळ काढणं शक्य नसतं. जिम अथवा बाहेर केल्या जाणाऱ्या व्यायामानेच वजन घटते असं नाही. त्यासाठी काही सोप्या पद्धतीही आहेत, ज्यामुळं वजन कमी होऊ शकतं.

त्या पुढिल प्रमाणे – 1. गरम पाणी प्यायला सुरुवात करा – सकाळी सकाळी उपाशीपोटी लिंबु + गरम पाणी प्यायल्यास, मेटाबॉलिजम वाढतं आणि त्यामुळं वजन कमी होण्यास मदत होते. पाण्यात लिंबू पिळून पाणी प्यायल्यास, विटामिन सी, पोटॅशियम आणि फायबर मिळतं. लिंबू खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी निघून जाते आणि वजन कमी होते. त्यामुळे दिवसभरात कमीत कमी १ लिंबू आपल्या शरीरात जाणं गरजेचं आहे. यापेक्षा जास्त लिंबू खाऊ नये. 2. भरपूर झोपा – तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर, भरपूर झोपा. झोपेच्या वेळी तुमच्या शरीराचा थकवा आणि ताण मिटतो. वजन घटवण्याच्या प्रक्रियेत भरपूर झोप हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तुमच्या हंगर हार्मोन्सनादेखील झोप स्थिर करते, ज्यामुळे तुमची भूक नियंत्रणामध्ये राहाते. 3. जिऱ्याचं पाणी – वजन कमी करण्यासाठी जिरे हे रामबाण औषध आहे. एक चमचा जिरे तुम्ही रोज खाल्ल्यास, तीनपट वेगाने तुमचं वजन कमी होतं. एका संशोधनातून वजन कमी करण्यासाठी जिरे महत्त्वपूर्ण असल्याचं सिद्ध झालं आहे. हे केवळ जास्त कॅलरीच बर्न करत नाही तर, मेटाबॉलिजमचा रेट वाढवून पचनक्रियादेखील नीट करतं. घरी करण्यात येणारे व्यायाम आजकाल तर घरी व्यायाम करणंदेखील सोपं झालं आहे. तुम्ही गुगलवर Exercise to loss weight at home video सर्च केल्यास, अनेक व्हिडिओ दिसतील ज्यांच्या मदतीने तुम्ही रोज घरच्या घरी वजन कमी करण्यासाठी व्यायाम करू शकता. विश्वास ठेवा बऱ्याच लोकांनी हे व्हिडिओ पाहून आपलं वजन कमी केलं आहे. तुम्हाला वजन कमी करण्याच्या काही सोप्या पद्धती, ज्या तुम्ही रोज फॉलो करू शकता -


· जंप स्क्वेट एक्सरसाइज · लेग लिफ्ट एक्सरसाइज · दोरीउडी (Skipping) · पुश- अप एक्सरसाइज · उठाबशा · डान्स · झुम्बा · एरोबिक्स



टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page