top of page
Search

शुक्रधातु

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jul 10, 2021
  • 1 min read

आयुर्वेदानुसारशरीरातील सातधातूंपैकी हा शेवटचा धातू. आहारापासून सर्वप्रथम रसधातूची यानंतरक्रमाक्रमाने पुढीलधातूंची निर्मितीहोते. यानुसार अस्थिधातूपासूनशुक्रधातूची निर्मितीहोते. पांढऱ्यारंगामुळे या धातूला शुक्रअसे म्हटलेजाते. शुक्रधातूहा सर्वधातूंचे सारस्वरूप असल्यानेइतर धातूंप्रमाणेयाचे मल अथवा उपधातूनाहीत. रसधातूते शुक्रधातूपर्यंतचा निर्मितीचाकाळ तीसदिवसांचा असतो. आयुर्वेदाने शुक्रधातूचेदोन प्रकारेवर्णन केलेआहे. पहिल्याप्रकारचा शुक्रधातूहा संतानोत्पत्तीसाठीकारणीभूत असूनतो पुरुषांमध्येचअसतो. हा स्फटिकाप्रमाणे वर्णअसलेला, स्निग्ध, पातळसर, चवीलागोड आणिमधाप्रमाणे गंधअसणारा असतो. प्रत्येक धातूचीवाहण्याची व्यवस्थाअसते त्यालास्रोतस असेम्हणतात. त्याचीमूलस्थानेही आयुर्वेदानेसांगितली आहेत. शुक्रवह स्रोतसाचेमूलस्थान वृषण (अंडकोश) म्हणजेपुरुष जननेंद्रियहे सांगितलेआहे. दुसऱ्याप्रकारचा शुक्रधातूसर्व शरीरभरअसतो. मनामध्येधैर्य, प्रसन्नता, आनंद उत्पन्नकरणे आणिशारीरिक बल उत्तम राखणेहे या शुक्रधातूचे कार्यआहे. हा शुक्रधातू पुरुषांप्रमाणेस्त्री शरीरामध्येदेखीलअसतो, परंतुहा गर्भनिर्मितीकरण्यास सक्षमनसतो. पुरुषांमध्येमात्र संपूर्णशरीरात व्याप्तशुक्रधातू समागमाच्यावेळी अत्युच्चआनंदाच्या क्षणीपुरुषाच्या जननेंद्रियातूनबाहेर पडतोआणि गर्भनिर्मितीसाठीकारणीभूत ठरतो.

ज्या स्त्रीअथवा पुरुषामध्येशुक्रधातू उत्तमअसतो, त्यालाशुक्रसार पुरुषम्हणतात. अस्थितसेच दातस्निग्ध संहत म्हणजेसुसंघटित असणे, कामेच्छा प्रबळअसणे आणिभरपूर संततीअसणे ही शुक्रसार पुरुषाचीलक्षणे सांगितलीआहेत. चिंता, दीर्घकाळ आजारीअसणे, खूपशारीरिक कष्टकरणे, अतिप्रमाणातमैथुन करणेआणि वार्धक्ययांमुळे शुक्रधातूचाक्षय होतो. शुक्रधातूचा क्षयझाल्यास वृषणप्रदेशात पीडाम्हणजे दुखणे, मैथुन करण्यासअसमर्थता, तोंडकोरडे पडणे, थकवा येणेही लक्षणेउत्पन्न होतात. स्वस्थ व्यक्तीमध्येशुक्रधातूचे प्रमाणअर्धी ओंजळम्हणजे अंदाजे९६ मिलि. सांगितले आहे.

Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page