षड्रस चिकित्सा
- divipawar94
- Jun 26, 2021
- 2 min read
रस म्हणजे चव होय. आयुर्वेदानुसाररसना म्हणजे जीभ. जीभ याइंद्रियाने ज्या अर्थाचे (विषयाचे) ज्ञान होते त्याला रसम्हणतात. रस ही संकल्पनाफक्त पदार्थाची चव इतकीच मर्यादितनसून शरीरातील धातुघटक, औषधिकरणामध्ये पारद इत्यादी म्हणूनहीवापरली गेली आहे. परंतु, येथे षड्रस संकल्पनेमध्ये पदार्थांमध्ये असणारे गोड, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरटया सहा (षड्) रसांचाम्हणजे सहा चवींचा उल्लेखअपेक्षित आहे. जीभेद्वारे याचवींचा आस्वाद घेता येतो, यासमान भावामुळेच या सर्वांना रसअसे म्हणतात. आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांतापैकी षड्रस सिद्धांताचे विशेष महत्त्व आहे. द्रव्य वापदार्थ प्रधान असूनही जर त्याला चवनसेल तर त्याचे कार्यसमजणे तसे कठीणच आहे. पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी व त्याच्या परीचयासाठीरसच कारणीभूत असतो. सामान्यत: पदार्थाचे गुणधर्म, परिणाम इ. अनुमान रसानेचसहज करता येतात. दैनंदिनव्यवहारात आपला आहार तसेचरोगोपचारमध्ये द्रव्य किंवा औषधे निवडताना रसांचाविचार करणे गरजेचे असते. षड्रसांचा उल्लेख आयुर्वेदात आहारातील निवड, दिनचर्या, ऋतूचर्या, चिकित्सा इत्यादींमध्ये पदोपदी आढळतो. आयुर्वेदाचे प्रयोजन स्वास्थ्य उत्तम राखणे हे आहे वते टिकवून ठेवण्यासाठी हितकर आहार द्रव्यांचा विस्तृतविचार आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये केला आहे. याच्याविपरीत जर चुकीच्या आहार-विहारामुळे किंवा जीवन पद्धतीमुळे रोगांचाप्रादुर्भाव झाल्यास त्यासंदर्भातील आवश्यक तो विचार आयुर्वेदीयग्रंथांमध्ये आहे. यासाठी ज्याद्रव्यांचे प्रयोजन केले जाते त्यातरस विचार प्राधान्याने केला गेला आहे. रसाची उत्पत्ती किंवा चवीची अभिव्यक्ती होण्यासाठी पंचमहाभूतांचा विशिष्ट परमाणू संयोग अपेक्षित आहे. सृष्टीतील प्रत्येकवस्तू ही पंचमहाभूतांच्या संयोगानेचबनली आहे. त्यांच्या परमाणूच्याकमी जास्त प्रमाणाने त्या त्या वस्तूलात्याचे स्वरूप व अस्तित्व असते. आपले शरीर देखील यामहाभूतांपासूनच बनले आहे, म्हणूनत्याचा समतोल राखण्यासाठी घेतला जाणारा आहार व बिघडल्यासकेली जाणारी चिकित्सा द्रव्ये ही महाभूतांपासूनच बनलेलीआहेत. यानुसार आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये सहाही रसांची उत्पत्ती कोणत्या महाभूतांच्या संयोगाने झाली आहे वत्यांचे शरिरातील दोषांवर, धातूंवर काय परिणाम दिसतोयाचे सविस्तर वर्णन आहे.
प्रत्येकरसातील महाभूत प्राधान्य व दोषांवरील त्याचेकार्य खालीलप्रमाणे आहे —
1. गोडचव : पृथ्वी आणि जल (पाणी), कफ दोष वाढविणारा वपित्त-वाताला शांत करणारा आहे.
2. आंबटचव : पृथ्वी आणि अग्नि, पित्त-कफ वाढवून वातालाशांत करणारा आहे.
3. खारटचव : पाणी आणि अग्नि, कफ-पित्त वाढवून वाताला शांत करणारा आहे.
4. तिखटचव : हवा आणि अग्नि, पित्त-वात वाढवून कफालाशांत करणारा आहे.
5. कडूचव : हवा आणि आकाश, वात वाढवून पित्त-कफाला शांत करणारा आहे.
6. तुरटचव : हवा आणि पृथ्वी, वात वाढवून पित्त-कफाला शांत करणारा आहे.
समतोलराखण्यासाठी कोणत्याही एकाच रसाचे सेवनन करता सहाही रसांनीयुक्त अशा पदार्थांचा समावेशआपल्या दैनंदिन आहारामध्ये केला जाणे आवश्यकआहे. ऋतुनुसार ही भिन्न भिन्नरसांची उत्पत्ती होते. शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत ह्यासहा ऋतूंत क्रमाने कडू, तुरट, तिखट, आंबट, खारट व गोडरस उत्पन्न होतात. गोड, कडू, तुरटहे सौम्य गुणधर्माचे तर तिखट, आंबट, खारट रस हे उष्णगुणधर्माचे आहेत. भोजनाची सुरुवात गोड रसाने करावी, तर मध्यावर आंबट, खारट व शेवटकडू, तुरट, तिखट रसांनी करावा. चिकित्सेतही दोषांनुसार रसांचा वापर केला गेलाआहे. वातदोषांच्या चिकित्सेत प्रथम खारट नंतर आंबटव शेवटी गोड रसांची औषधेवापरावीत. पित्तासाठी पहिला कडू, नंतर गोडव शेवटी तुरट आणि कफदोषाच्या चिकित्सेत तिखट, कडू व तुरटया क्रमाने औषधांचा वापर सांगितला आहे. रसांचा योग्य वापर हा जसाउपयुक्त आहे तसाच अतिरेकविविध आजारांना आमंत्रण देणारा ठरतो. उदा., गोड चवीचा पदार्थबल, स्निग्धता देणारा आहे. परंतु, त्याचाअतिरेक स्थूलता, खोकला, दमा इ. आजारांसाठीकारणीभूत ठरतो. आंबट पदार्थ पचनकरणारे, वाताचे अनुलोमन करणारे असून त्याच्या अतिरेकानेरक्ताचे आजार, शरीरात खाज व दाहउत्पन्न करणारा ठरतो. याप्रमाणेच उर्वरीत रसांचेही सविस्तर वर्णन केले आहे. एकंदररसाचा सर्वांगीण विचार हा व्यवहारात, दैनंदीनजीवनात तसेच चिकित्सा करतानाअतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आयुर्वेदाच्यापायाभूत सिद्धांतामध्ये त्यास महत्त्वाचे स्थान आहे.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)



Comments