संत्री फळाचे आरोग्यदायी फायदे
- divipawar94
- Jun 13, 2021
- 2 min read

शास्रीय नाव(Scientific Name) : सिट्रस एक्स सिनेसिस (Citrus X sinensis)
इंग्रजी नाव: ऑरेंज (Orange)
संत्री फळात असणारे आरोग्यदायी घटक
प्रोटीन: ०. ९४ ग्रॅम व्हिटॅमिन ए :१०% पोटॅशियम: ५%,
फायबर: २.४ ग्रॅम व्हिटॅमिन सी : ७१% फोलेट :८%
शुगर : ९. ३५% ग्रॅम व्हिटॅमिन बी १: ७%
कॅलरीज : ४७. ० व्हिटॅमिन बी ५ :५% फॅट : ०. १२ ग्रॅम
संत्री खाण्याचे फायदे
1. संत्र्यामध्ये अॅंटिऑक्सिंडट भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे जर तुमच्या आहारात संत्र्यांचा समावेश असेल तर तुमच्या त्वचेचे फ्री रेडिकल्सपासून होणारे नुकसान कमी होते. जर तुम्हाला कायम तरूण आणि उत्साही दिसायचं असेल तर संत्री खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. संत्री खाण्याचे फायदे केवळ शरीरावरच नाही तर सौंदर्यावरही परिणामकारक ठरतात. दररोज सकाळी नाश्त्यामध्ये एक संत्रे अथवा संत्र्याचा ज्यूस घ्या. ज्यामुळे तुमची त्वचा नेहमीच नितळ आणि सुंदर दिसेल.
2. आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी सोडियमची मात्रा आपल्या शरीरात असणे आवश्यक आहे . तसेच Orangeआपल्या शरीरातील पोटॅशियमचे सेवन वाढविणे तेवढेच गरजेचे आहे. एका अभ्यासात केलेल्या रिसर्च नुसार असे लक्षात आले कि ज्या फळात पोटॅशियम चे प्रमाण जास्त आहे अशी फळे जर आपण खाल्ली तर आपल्या मृत्यूचे प्रमाण २% घटते.
3. संत्री (orange) हे अँटिऑक्सिडेन्ट व व्हिटॅमिन सी चा भरपूर चांगला स्रोत आहे. ज्या मुक्त रॅडिकल्स आपल्याला शरीरासाठी कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरतात त्या नष्ट होण्यास मदत होते. अमेरिकन जर्नल ऑफ एपिडेमियॉलॉजि मध्ये केलेल्या अभ्यासानुसार असे लक्षात आले कि जीवनाच्या पहिल्या २ वर्षात संत्री, केळी व संत्र्याचा ज्युस प्यायलास आपल्याला बालपणात होणार रक्ताचा (ऍनेमिया)धोका कमी होतो.
4. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास खूप मदत करतात . तसेच हे फळ आपल्या शरीरासाठी लागणारे फोलेट व कॉपर पण भरपूर प्रमाणात पुरवतात जे आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप लाभदायी व्हिटॅमिन्स आहे. संत्र्यामध्ये पॉलिफेलनॉयल भरपूर प्रमाणात असतात. जे आपल्या शरीरात असणाऱ्या व्हायरस इन्फेकशन पासून आपला बचाव करतात.
5. Orange फळात असणाऱ्या अनिटॉक्सिडेंट , फोलेट आणि पोटॅशियम सारख्या व्हिटॅमिनस मुळे आपले हृदय स्वस्थ आणि चांगले राहते. ह्यात असणाऱ्या व्हिटॅमिन सी आणि अनिटॉक्सिडेंट मुळे आपल्या शरीरात असणाऱ्या धमनीचा फ्री रॅडिकल्स पासून बचाव करते.
6. गरोदर स्त्रियांना प्रेगनन्सी मध्ये उलटी होणे, मन चलबिचल होणे घाबरल्यासारखं वाटणे किंवा आंबट ढेकर येणे यांसारख्या समस्या निर्माण होतात त्यावेळी त्यावर Orange संत्र्याचा ज्युस पिणे हे फायदेशीर आहे. तसेच ह्या फळाचे सेवन नियमित केल्याने जन्माला येणारे बाळ स्वस्थ , गोरे आणि सुंदर होतात
7. आजकाल अनेक महिलांना पीसीओडीचा त्रास जाणवत असतो. मात्र जर प्रत्येक महिलेने आहारात संत्र्याचा समावेश केला तर त्यांना हा त्रास नक्कीच होणार नाही. कारण संत्र्यामुळे महिलांच्या शरीराला आवश्यक पोषकमुल्य मिळतात
8. संत्र्यामध्ये फोलेट हे घटक आहे. ह्यात असणारे पॉलिफेनॉल मेंदूचा विकास करतात. तसेच आपली स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात . ह्या फळाचे जर आपण नियमित सेवन केले तर स्मरणशक्ती कमजोर नाही पडत. तसेच आपल्या मेंदूचा विकास सुरळीत करण्यास मदत होते.
9. संत्र्यामध्ये मध्ये घुलनशील आणि अघुलनशील असे दोन प्रकारचे फायबर असतात. त्यामुळे पोटातील आतडयांची सफाई चांगल्या प्रकारे होते. व्हिटॅमिन सी मुळे आपली पचनक्रिया मजबूत राहते व अन्न सहज पचण्यास मदत होते.
10. वजन नियंत्रणात राहण्यासाठी कमी कॅलरिज आणि फायबरयुक्त आहाराची गरज असते. संत्र्यामध्ये फायबर्सचे प्रमाण नक्कीच जा्स्त आहे. शिवाय त्यामुळे तुमच्या शरीराला कॅलरिजदेखील कमी मिळतात. म्हणूनच वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज संत्री खाण्यास जरूर सुरूवात करा. चांगल्या परिणामासाठी ज्यूसपेक्षा संत्र्याच्या फोडी खा.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments