स्वेदन
- divipawar94
- Jun 23, 2021
- 2 min read

‘स्वेदन’ ही आयुर्वेदात पंचकर्म करण्यापूर्वीची, स्नेहनानंतर करण्याची एक तांत्रिक प्रक्रियाआहे. तसेच वातदोष आणिकफदोष ह्यांनी होणाऱ्या रोगांमधे चिकित्सा म्हणून वर्णन केले आहे. ज्याप्रक्रियेमुळे किंवा औषधांमुळे शरीरात घामाची निर्मिती होते, त्याला ‘स्वेदन’ असे म्हणतात. शरीरअकडले असल्यास, शरीरात जडपणा किंवा थंडपणा असल्यास ते दूर करण्याचेकाम स्वेदनाने होते. ज्याप्रमाणे तेल लावून आणिशेकून कोरडे लाकूड देखील वळवता येते, त्याचप्रमाणे शरीरातील अकडलेले भाग स्वेदनाने ठीकहोतात. स्वेदनाचे अग्नीच्या वापरानुसार अग्नी स्वेदन आणि निरग्नी स्वेदनअसे दोन प्रमुख प्रकारपडतात. अग्नि स्वेदन ह्या प्रकारात स्वेदनकरण्यासाठी प्रत्यक्ष अग्नीचा वापर केला जातो; तर निरग्नी स्वेदन ह्यात अग्नीचा वापर न करताघामाची निर्मिती होते. उदा., व्यायाम, गरम खोलीत बसणे, गरम पांघरूण पांघरणे, भूक, जास्त प्रमाणातमद्यसेवन, भिती, राग येणे, पोटीसबांधणे आणि उन्हात बसणे. स्वेदनाचे एकांग स्वेदन आणि सर्वांग स्वेदनअसेही दोन प्रकार होतात. एकांग स्वेदनात मर्यादित स्थानी स्वेदन करतात. उदा., नाडी स्वेद, वाळूगरम करून त्याने सांध्यांनादिलेला स्वेद. ज्यावेळी संपूर्ण शरीराला स्वेदन दिले जाते, तेव्हात्याला ‘सर्वांग स्वेदन’ असे म्हणतात. उदा., बंद पेटीत दिलेला शेक. स्वेदनासाठी जीऔषधे वापरली जातात, त्यांच्यागुणधर्मांवरून स्वेदनाचे स्निग्ध स्वेदन आणि रुक्ष स्वेदनअसे दोन प्रकार होतात. कोमट तेलाची धारा हे स्निग्धस्वेदन, तर गरम वाळूनेशेकणे हे रुक्ष स्वेदनहोय. ज्यांना सर्दी, खोकला, उचकी लागणे, मान, कान, किंवा डोके दुखत असेल, तोंड वाकडे झाले असेल, शरीरजड वाटत असेल, लकवाअसेल, शरीर अकडलेले असेलत्यांना स्वेदन देतात. थंडी वाजणे बंदहोणे, वेदना थांबणे, अकडलेले शरीर मोकळे होणे, शरीर अधिक मऊ होणे, घाम येणे ही लक्षणेदिसली म्हणजे स्वेदन झाले असे समजावे.
संदर्भ :
चरकसंहिता — सूत्रस्थान, अध्याय १०, श्लोक ५ ; अध्याय १४, श्लोक ३, १३, १६-२४, ६४, ६५, ६६; अध्याय २२, श्लोक
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments