सुवर्णप्राशन
- divipawar94
- Jun 26, 2021
- 1 min read

सुवर्णप्राशनं ह्येतन्मेधाग्निबलवर्धनम।
आयुष्यं मङ्गलंपुण्यंवृष्यंग्रहापहम्॥
मासात् परममेधावीव्याधिभिर्नचघृष्यते।
षड्भिर्मासै: श्रुतधर: सुवर्णप्राशनाद्भवेत॥ (का.सं.सू.लेहाध्याय)
सुखं दु:खंहिबालानांदृश्यतेलेहनाश्रयम॥
सुवर्ण म्हणजेसोने. प्राशन करणे म्हणजे पिणेअथवा पाजणे. सुवर्ण प्राशनाचा अंतर्भाव लेहन या प्रकारातहोतो. लेहन म्हणजे चाटवणे. काश्यपसंहितेनुसार लेह बनविण्यासाठी पूर्वदिशेला तोंड करावे आणिधुतलेल्या दगडावर थोड्या पाण्याच्या साहाय्याने सोन्याला उगाळावे. तयार झालेल्या चाटणातमध आणि गाईचे तूपमिसळून ते बालकाला चाटवावे. यात मध आणि गाईचेतूप यांचे प्रमाण एकसारखे असू नये याचीकाळजी घेण्यास सांगितले आहे. साधारणत: दरमहिन्यात येणाऱ्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी सुवर्णप्राशन केले जाते. जन्मापासून१२ वर्षांपर्यंत बालकास सुवर्णप्राशन करवावे अशी प्रथा आहे. सुवर्णप्राशन केल्याने बालकाची बुद्धी वाढते, त्याला चांगली भुक लागते, त्याचीशारीरिक शक्ती वाढते, शरीराची कांती वाढते आणि लहान मुलांमध्येरोगप्रतिकारक्षमता वाढून त्यांचे अनेक रोगांपासून संरक्षणहोते, असे महर्षी काश्यपम्हणतात. हे सुवर्णप्राशन बालकांसाठीमंगलकारक आणि पुण्यकारक आहे. सुवर्णप्राशन नियमितपणे १ महिना केल्यासबालक बुद्धीमान आणि निरोगी होते. तसेच ६ महिने नियमितपणेकेल्यास त्याची स्मरणशक्ती अत्यंत तीव्र होते असेही तेम्हणतात. सुश्रुतसंहितेत मात्र सुवर्णप्राशन जातकर्मानंतर लगेच करावयास सांगितलेआहे. जन्मानंतर नाळ कापणे, बालकाचाकंठ स्वच्छ करणे इत्यादी क्रियांनाजातकर्म म्हणतात. त्यानंतर मध, तूप आणिथोडे सुवर्णभस्म एकत्र करून करंगळी शेजारच्याबोटाने बालकास चाटवावे, असे सांगितले आहे. तसेच या ग्रंथात सोने, वेखंड आणि बेल यांचेचूर्ण तुपासोबत चाटल्याने बुद्धी आणि आयुष्य वाढतेव आरोग्याचा लाभ होतो, असेदेखील सांगितले आहे. सध्या जोसुवर्णप्राशन संस्कार केला जातो त्यातहीसुवर्णभस्मच वापरले जाते. सुश्रुताचार्यांप्रमाणे वाग्भटाचार्यांनीही आपल्या अष्टांगहृदय याग्रंथात जातकर्मानंतर बालकास सुवर्णप्राशन करावयास सांगितले आहे. बालकाला सोनेआणि आवळकठी यांचे चूर्ण किंवा सोने, वेखंड, ब्राह्मी, सुवर्णमाक्षिक आणि हिरडा यांचेचूर्ण मध आणि तूपयांसह चाटवावयास सांगितले आहे.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments