सफरचंद खाण्याचे फायदे
- divipawar94
- Jun 13, 2021
- 1 min read

निरोगी आरोग्यासाठी दररोज सकाळी एक सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. यामुळे कित्येक गंभीर आजारांपासून आपला बचाव होण्यास मदत होते. सफरचंदाच्या सेवनामुळे अल्झायमर, कॅन्सर आणि ट्युमरसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होण्याची शक्यता आहे. या फळात असणाऱ्या फायबरमुळे आपलं पोट स्वच्छ राहण्यास मदत होते. शिवाय, हृदय आणि स्नायूंच्या समस्यांपासून तुमची सुटका होते. अल्झायमरच्या आजारात रुग्णाच्या स्मरणशक्ती कमी-कमी होत जाते. विसराळूपणा ही एक गंभीर समस्या निर्माण होऊ लागते. यामध्ये रुग्ण आपल्या नातेवाईकांनाही योग्यरितीनं ओळखू शकत नाही. या आजाराची लक्षणं जाणवू लागल्यास सफरचंदाचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरले. यामुळे मेंदूला पोषकतत्त्वं मिळतात. अमेरिकेतील कॅन्सर रिसर्चच्या संशोधकांनुसार, नियमित सकाळी नाश्त्यामध्ये रोज एक सफरचंद खाल्ल्यास स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याचा धोका जवळपास 23 टक्के कमी होतो. यामध्ये ट्युमर होण्याची शक्यताही कमी होती. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा व्यक्तींना सफरचंदाचं सेवन करणं फायदेशीर ठरते. सफरचंदातील पोषक तत्त्वांमुळे रक्तातील शर्करा नियंत्रित येते. ज्यांना खरंच आपलं वाढलेलं वजन नियंत्रणात आणायचं असेल तर त्यांनी सफरचंद खाण्यास सुरुवात करावी. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)



Comments