top of page
Search

"सामान्य पथ्य''

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Feb 19, 2022
  • 2 min read

काय खावे:-

१. चहा :- चहा घेत असल्यास सकाळी अर्धा कप - संध्याकाळी अर्धा कप आले टाकून घेणे.

२. नाष्टा (हलके पदार्थ) :- उपीट (सांजा), शिरा, भाजणीचे थालीपीठ, भाजलेल्या पोह्यांचा चिवडा, साळीच्या

लाह्यांचा चिवडा, शिंगाड्याचे थालीपीठ इ.

३. पोळी / चपाती :- गव्हाचा फुलका, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी चालेल.

४. फळभाज्या :- दूधी भोपळा, पडवळ, भेंडी, दोडका, घोसाळे, गिलके, तोंडले, पांढरे वांगे, काकडी, सुरण, नवलकोल, शिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, कोहळा, केळफुल, श्रावणघेवडा ह्या भाज्या चालतील. (जांभळे वांगे, बटाटे, टोमॅटो, रताळे खाऊ नयेत.)

५. पालेभाज्या :- राजगिरा, तांबडा माठ, साधामाठ, चवळाई (तांदुळजा) ह्या भाज्या चालतील. उपरोक्त

भाज्यांना किंवा आमटीला (फोडणी घालयची असल्यास) धने, जिरे, सायूक तुपाची फोडणी घालावी. हिरवी मिरची वापरू नये, लाल तिखट कमी प्रमाणात चालेल, गरम मसाले वापरू नये. सांगितल्यास पालेभाज्या बंद करणे.

६.शेंगभाजी :- शेवगा सोडून इतर शेंगभाजी (गवार, पावटा, वाल, वटाणा इ.) बंद करणे

७. कडधान्ये :- फक्त मूग बाकी सर्व मोड आलेली कडधान्ये, मटकी, वाटाणा, हरभरा, छोले बंद करणे. सांगितल्यास तुरीचे वरण ! फिकी आमटी चालेल. मसाले घालू नये. कडधान्ये खायला सांगितल्यावर प्रथमत: मोड न आणता कडधान्ये भाजून घेणे व त्यांना हिंग कढिपत्ता, लसूण, आले, ओल्या नारळाचा किस घालून शिजवणे,

८. भात :- सांगितले असल्यास भाजलेल्या तांदळाचा भात, माफक मात्रेत. शक्यतो फक्त

सकाळच्या जेवणात घ्यावा.

९. चटण्या :- आमसुल, करवंदे, ओल्या नारळाची, लसणाची, कांद्याची चटणी चालेल. (हिरवी

मिरची घालू नये)

१०. कंदमुळे :-मुळा, गाजर चालेल.

११. पाणी :- उकळून गार केलेले पाणी. तहान लागल्यावरच माफक प्रमाणात ग्लासला ओठ

लावुन घोट-घोट प्यावे वरून पाणी पिऊ नये. जेवणाच्या सुरूवातीला व नंतर लगेच

पाणी पिऊ नये जेवतांना घोट-घोट पाणी प्यावे.

१२. जेवणाची वेळ :- सकाळी १० ते १ च्या दरम्यान व संध्याकाळी ५ ते ७ दरम्यान शक्यतो हलका

आहार घ्यावा, अन्न चावून खावे, गप्पा मारत किंवा टिव्ही बघत जेवण करू नये. फोन/ मोबाईलवर बोलत जेवण करू नये.

१३. फळे :- अंजीर, मोसंबी, मनुका, डाळींब, डोंगरी आवळा, गोड आंबा, आमसुल, एवढीच

फळे खावीत. शक्यतो दुपारच्या वेळेत खावीत.


काय खाऊ नये:-

१४. शिळे पदार्थ :- फोडणीचा भात, भाकरी, पोळी, शिळीकढी, आमटी फ्रिजमध्ये ठेवलेले शिळे पदार्थ

(फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या) बंद करणे.

१५. बेकरीचे पदार्थ :- टोस्ट, बिस्किटे, ब्रेड, केक, सँडविच, पिझ्झा, बर्गर, क्रिमरोल, बटर खारी, पॅटिस

बंद करणे.

१६. आंबवलेले पदार्थ :- दही, दह्यापासून बनविलेले पदार्थ, इडली डोसा, ढोकळा (इन्स्टन्ट बनविलेले सुध्दा)

आप्पे बंद करणे ताज्या दह्याचे ताजे ताक चालेल.

१७. हरबऱ्याचे पदार्थ :- पिठले, शेव, फरसाण बंद करणे, भाजीला हरभरा पीठ लाऊ नये, तिखट, तेलकट,

चमचमीत पदार्थ (समोसा, कचोरी) पापड, साबुदाणा, शेंगदाणे, पोहे बंद करणे, (पोहे घ्यायचे असल्यास भाजून नंतर त्याचे पोहे बनवणे.) पाणीपुरी, भेळ, भडंग,

रगडा पॅटीस इ. बंद करणे

१८. व्यसन :-

* बीअर, दारू पिऊ नये. * दुध, कॉफी नको (गायीचे ताजे दुध चालेल)

* गुटखा, सिगारेट घेऊ नये. * मिठाई खाऊ नये.

* मिसरी लावू नये.

* मांसाहार करू नये.

१९. निद्रा :- रात्री जागरण व दिवसा झोपणे टाळावे. रात्री जागरण झाल्यास जितके तास जागरण झाले त्याच्या निम्मा वेळ सकाळी जेवणाआधी झोपावे. सांगितले असल्यास संपुर्ण ब्रम्हचर्येचे पालन करणे.

२०. उपवासाचे पदार्थ :- साबुदाण्याची खीर, शिंगाड्याचे थालीपीठ, आमसुलाचे सार, वरईच्या तांदळाचा

भात(भगर), भाजणीचे थालीपीठ, खजूर, वेलची केळ (फक्त उपवासालाच चालेल) शेंगदाणे वापरायचे असल्यास भाजून मधला नार काढून कमी प्रमाणात वापरावे.


टिप :-

* दिलेली औषधे खंड न पाडता व पथ्य पाळली तर आजार पूर्ण बरा होण्यास कालावधी कमी लागेल.

* वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT (Diploma In Yoga Teacher)

[योग शिक्षिका]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page