top of page
Search

सुंदर नितळ त्वचेसाठी

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Dec 7, 2021
  • 3 min read

सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही? पण एकदा का पिंपल्स यायला लागल्या की चेहऱ्याची रयाच बिघडून जाते. आपल्या चेहऱ्याची काळजी आपण कशी घ्यावी याबद्दल जाणुन घेऊयात,


तरुण वयात शाल्मलीच्या काट्यांप्रमाणे फोड यायला लागतात याला तारुण्य पिटिका किंवा मुखदूषिका असे म्हणतात.सामान्य भाषेत आपण याला Pimples असे म्हणतो. आयुर्वेदानुसार याचा समावेश क्षुद्र रोगात केलेला आहे. या ब्लॉग मध्ये आपण विविध प्रकारचे त्वचेचे विकार आणि त्यासाठी घरगुती उपाय बघणार आहोत.


त्वचा खराब होण्याची कारणे -

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, मानसिक ताणतणाव, प्रदूषणाचा परिणाम, व्यायाम अजिबात न करणे या सर्व गोष्टींमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, चेहऱ्यावर काळे डाग येणे, चेहरा काळवंडणे या सर्व समस्यांना तोंड द्यावे लागते.


चेहरा काळवंडणे कारणे आणि उपाय -

उन्हामुळे जर चेहरा कलावंडत असेल किंवा tan होत असेल तर एक चमचा आवळा पावडर, एक चमचा पुनर्नवा पावडर, पाव चमचा आंबे हळद पावडर, दोन चमचे मसूर डाळीच्या पिठात साध्या पाण्यात किंवा गुलाब जलात मिक्स करून त्याचा चेहऱ्याला लेप करावा. लेप साधारणतः दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर ठेवावा किंवा सुके पर्यन्त ठेवावा व नंतर कोमट पाण्याने तो धुऊन काढावा. यात आवळा रसायन आहे, पुनर्नवा मुळे सूज कमी होते, आंबे हळदीमुळे वर्ण सुधारतो व मसूर डाळीच्या पिठामुळे काळे डाग कमी होतात.


चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवायचे उपाय -

चेहऱ्यावर जर wrinkles म्हणजे सुरकुत्या असतील तर सायीसह घट्ट दही, वाळा आणि रक्तचंदन यांचा लेप करावा. साधारणतः एक चमचा दही, अर्धा चमचा रक्तचंदन आणि एक चमचा वाळा हे एकत्र करून चेहऱ्यावर वाळेपर्यन्त लेप ठेवावा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वछ धुवावा. यातील वाळा पित्त शांत करतो, रक्तचंदन रक्त शुद्ध करायला मदत करते आणि दही मऊपणा आणायला मदत करते.


चेहऱ्यावरील खड्डे घालवण्यासाठी उपाय -

चेहऱ्यावर मोठमोठे पिंपल्स आल्यामुळे चेहऱ्यावर खड्डे पडतात.त्यामुळे चेहेरा चांगला दिसत नाही. यासाठी एक चमचा उडीद डाळ पाण्यात शिजवून त्यात एक चमचा तैल किंवा तूप टाकून परत शिजवावे.ती बारीक करून त्याचा लेप चेहेऱ्याला लावावा.हा लेप साधारणतः दहा ते पंधरा मिनिटे ठेवावा नंतर गरम पाण्याने स्वछ धुवून घ्यावा.



कोरड्या आणि फुटलेल्या ओठांवर उपाय -

थंडीत जर ओठ फुटत असतील तर रात्री झोपताना बेंबीमध्ये मोहरीच्या तेलाचे दोन थेंब टाकावेत. मोहरी उष्ण असल्यामुळे थंडीत शरीराच्या तापमानाचे नियमन होते व ओठ फुटणे कमी होते.


Pimples -

चेहऱ्यावर जर मोठे जाड पिंपल्स येत असतील तर लोध्र, धणे व वेखंड यांचा लेप चेहऱ्यावर केल्यास पिंपल्स लवकर बसतात किंवा लवकर जातात. त्यात लोध्र एक चमचा, धणे एक चमचा आणि वेखंड पाव चमचा एकत्र करावे. त्यामध्ये साधे पाणी किंवा गुलाबजल तुम्ही एकत्र करू शकता. याचा लेप चेहऱ्यावर केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे ठेवावा किंवा सुकेपर्यन्त ठेवावा. लेप सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाकावा.



डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी उपाय -

डोळ्यांभोवती Dark Circles येत असतील किंवा चेहरा काळवंडला असेल किंवा सुरकुत्या पडल्या असतील तर आयुर्वेदातील एक विशेष उपाय तुम्हाला उपयोगी पडू शकेल आणि तो म्हणजे सकाळी तोंड धुवून झाल्यावर तिळाचे तैल कोमट करावे आणि आपल्या तोंडात मावेल इतक्या तीळ तेलाची गुळणी पकडावी. ही गुळणी साधारणपणे सुरुवातीला तीन ते चार मिनिटे धरली तरी पुरेशी असते. आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे की डोळ्यातून पाणी येईपर्यन्त ही गुळणी धारावी. याचा फायदा असा होतो; तिळाचे तैल अनुष्ण असल्यामुळे तिथल्या सर्व रक्तवाहिन्यांना बळ देते, रक्त प्रवाह सुधारतो आणि त्यामुळे चेहऱ्याचा काळवंडलेपणा कमी होतो, सुरकुत्या कमी होतात.


या सर्व समस्यांना दूर ठेवायचे असेल तर आयुर्वेदाची आहार, निद्रा व ब्रह्मचर्य ही त्रिसूत्री अत्यंत महत्त्वाची आहे.आहार कसा असावा- वेळेत जेवावे, प्रमाणात खावे आणि योग्य त्या पदार्थांचे सेवन करावे.निद्रेवरच आयुष्याचे सुख आणि दुःख अवलंबून आहे.त्यामुळे पुरेशी झोप योग्य वेळेत घेणे हे अत्यंत गरजेचे आहे.त्यामुळे शरीर शांत राहते, मन शांत राहते व चेहरा उजळ राहतो. चेहऱ्याला होणारे पिंपल्स सारखे इन्फेकशन्स होत नाहीत.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT (Diploma In Yoga Teacher)

[योग शिक्षिका]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page